Home करियर सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते टिन शेड काम प्रगतीपथावर -NNL

सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते टिन शेड काम प्रगतीपथावर -NNL

नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने सिडको येथील जलकुंभ लगत असलेल्या संरक्षण भिंत जवळील वृत्तपत्र विक्रेते यांच्या साठी टिनशेड उभारणीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.

नावामनपाचा वतीने माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या पुढाकाराने व सिडको परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते यांच्या साठी १६ बाय ३३ मध्ये टिनशेड उभारणीचे काम होत असुन यासाठी मध्ये११लाख५० हजारांचा निधी मंजूर झाल्यानंतर या कामाचे भूमिपूजन महापौर जयश्री ताई पावडे, उपमहापौर मसुदखान,माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेवक लतीफ भाई, नासेरभाई यांच्या सह सिडको परिसरातील नगरसेवक प्रतिनिधी ऊदय देशमुख, सिध्दार्थ गायकवाड व मान्यवरांच्या उपस्थितीत १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.

टिनशेड चे बांधकाम ऊजमा आशा कन्स्ट्रक्शन चे मुजीब भाई हे काम करत असुन, अंत्यंत दर्जेदार हे काम लवकरच पूर्ण होत आहे. या कामाची पाहणी मनपाचे अभियंता गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी हे पाहत आहे सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेची मागणी अखेर काही दिवसांत पुर्ण होत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!