Home लाइफस्टाइल आपल्या गुरुना सेवानिवृतीच निरोप देतांना माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आश्रु – NNL

आपल्या गुरुना सेवानिवृतीच निरोप देतांना माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आश्रु – NNL

हदगाव, शे.चांदपाशा| माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपण सर्व माझ्या समोर दिसत आहात. परंतु माझे हजारो विद्यार्थी देशात-परदेशात चांगल्या पदावर कार्यरत आहेत ते या ठिकाणी दिसत नाही. त्यांची आठवण यावेळी येत आहे त्यांना विसरणे शक्यच नाही. तसेच नोकरीला येताना माझ्यासोबत माझे आई-वडील होते आता ते नाहीत पण पुढे जमलेला एवढा मोठा परिवार माझ्या पाठीशी आहे. असे सांगून सेवानिवृत्ती कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना येथील पंचशील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हदगावकर मॅडम यांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा लागल्या पुढे त्यांना बोलणे शक्यच झाले नाही.

30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका हदगावकर मॅडम यांचा सेवानिवृत्ती निरोप कार्यक्रम गुरुवारी पंचशील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष वाठोरे काका सचिव सुनीलभाऊ सोनुले कोषाध्यक्ष शिवाजीराव तावडे संचालक पवार काका, जगन कदम सह गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले विस्तारअधिकारी सुनिल पाटील तालूक्यातील आजी-माजी मुख्याध्यापक आजी-माजी नगराध्यक्ष, नगरवक, सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थाचालक बालासेप्रसाद मुंदडा, नंदकुमार हनवते शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रदीर्घ काळ विज्ञानाच्या उत्तम शिक्षिका व नंतर काहीवर्ष कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका म्हणून श्रीमती हदगावकर मॅडम यांनी अतिशय पारदर्शक कारभार पाहिला असे उदगार अनेक आजी-माजी मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी याप्रसंगी बोलताना काढले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले यांनीही मॅडमच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एन.जी. गोरे, सुत्रसंचलन जे.बी.देशमुख,कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व आभारप्रदर्शन बी.आर.ताडेवाड सरांनी केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!