Home धर्म अध्यात्म संकट ही जीवनाच्या कलेला तळपत्या सोन्या सारखी चकाकी देतात – स्वामी विशुद्धानंद -NNL

संकट ही जीवनाच्या कलेला तळपत्या सोन्या सारखी चकाकी देतात – स्वामी विशुद्धानंद -NNL

नायगाव,दिगंबर मुदखेडे। संकट ही जीवन जगण्याच्या कलेला तळपत्या सोन्या सारखी चकाकी प्राप्त करून देणारी असतात.जीवनात संकट ही प्रत्येकालाच येत असतात संकट आली म्हणजे घाबरून न जाता त्याला धैर्याने सामना करावा. म्हणजे मानवी जीवन संकटात फुलून निघते या साठी प्रभू नाम का अमृत ही त्याचा आधार ठरतो असे प्रतिपादन स्वामी विशुद्धानंद महाराज पंचपीठम मठ संस्थान हाळदा यांनी स्वामी वैष्णवानंद पुण्यतिथी सोहळ्यात गुलाल उधळण्याच्या कार्यक्रमातून उपस्थित भक्त गणांना पर्वचनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना केले.

मांजरम ता. नायगाव येथील स्वामी वैष्णवानंद यांच्या संस्थानात दरवर्षीप्रमाणे स्वामी वैष्णवानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३०, नोव्हेंबर ,१ व २ डिसेंबर रोजी सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्तिक वद्य एकादशी दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी स्वामींच्या समाधीचे पूजन, रात्री ७ वाजता वे.शा.सं. रमेश गुरु राहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक सोहळा पार पडलारात्री ९ ते १२ विठ्ठलेश्वर भजनी मंडळ, जिजामाता महिला भजनी मंडळ, महात्मा बसवेश्वर भजनी मंडळ, हनुमान सेवा दल, गुरुदेव सेवा दल आदी भजनी मंडळ मांजरम यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्तिक वद्य द्वादशी १ डिसेंबर बुधवारी स्वामीच्या पुण्यतिथीचा सोहळा, दुपारी १ ते ३ स्वामीच्या पुण्यतिथीचा सोहळा वैदीयकार्यक्रम सर्वश्री वे.शा.सं.रमेश गुरु राहेरकर ,विठू देशाई ,उत्तम गुरु नायगावकर, बाळासाहेब कुलकर्णी बरबडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक विधीने पार पडला.

दुपारी ३ ते ४ विशुद्धानंद महाराज हाळदा यांचे प्रवचन, ह.भ.प.बाबू गुरु शिराढोणकर यांचे स्वामीच्या गुलालाचे भजन, त्यांना हार्मोनियमची साथ अनंत मंगनाळे, विनायक शिंदे,बाबू पाटील, गोविंद वरटी, भानुदास शिंदे, तबला साथ हरिप्रसाद बाळासाहेब पांडे मांजरमकर, मृदंग साथ बालू महाराज पांडे यांनी दिली.

रात्री ९ ते ११ विनोदाचार्य ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर यांचे कीर्तन, १२ ते १ दरम्यान बालकलावंत कु.विरा गणेश हाके यांचा भक्तीगीत, गवळण व धार्मिक गीतावर आधारित सुगम भक्ती गीत संध्या कार्यक्रम, तर भजनसम्राट विश्वनाथ भोगले यांचा ‘भजनसंध्या’ कार्यक्रम साजरा झाला.

रात्री संगीत भजन यामध्ये संगीत अलंकार प्राप्त, शंकर बिरादार, प्रा. माधव किन्हाळकर, कु. बेळकोणिकर, भाग्यश्री बाळासाहेब पांडे, त्र्यंबक स्वामी,रमेश पा.खैरगावकर,सुभाष शिंपाळे ,बालाजी चौधरी, शरद पा. कोलंबीकर,शिवा डाकोरे ,श्याम पाटील नरंगलकर रावसाब पाटील, हावगी पनासे,दता पा. व कोलंबी, नरंगल,,मांजरम येथील भजनी मंडळीचे कलावंत हजेर होते. . तबलासाथ हरिप्रसाद पांडे, मेघराज नाईक,मृदंग विश्वेश्वर जोशी कोलंबीकर,,ढोलकी , ढोल ज्ञानेशवर. बैस, बासरीवादन विजय द्रोणाचार्य, हार्मोनियम गणेश हाके सर यांची साथ होती.

कार्तिक वद्य त्रयोदशी २ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी ७ वाजता वे.शा.सं. संतोष गुरु राहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीच्या समाधीला अभिषेक, नंतर स्वामीच्या पादुका व प्रतिमा यांची मांजरम नगरीतून मुख्य रस्त्यावर पालखी मिरवणुकीचा सोहळा संपन झाला. सकाळी ११ वा. स्वामीचे वशंज हरिप्रसाद पांडे, अर्णव देसाई यांच्या हस्ते दही हंडी फोडून काल्याच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!