Home क्राईम टेंभीच्या त्या बेपत्ता युवकाचा विहिरीत तरंगतांना आढळला मृतदेह -NNL

टेंभीच्या त्या बेपत्ता युवकाचा विहिरीत तरंगतांना आढळला मृतदेह -NNL

टाकराळा जंगलातील... त्या घटनेशी या मुलाच्या मृत्यूशी काही संबंधी आहे काय..? चर्चेला उधाण

नांदेड, अनिल मादसवार| हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टाकराळा गावाच्या जंगलात तीन संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर त्या कुटुंबातील आणखी एक सदस्य जो कि मतिमंद होता तो बेपत्ता असल्याने त्याचा सर्वत्र शोधाशोध सुरु होता. पोलिसांनी संपूर्ण जंगल पिंजून काढला मात्र त्या युवकाचा काही पत्ता लागला नाही. दरम्यान आज दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी नित्याप्रमाणे शेतकरी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता टेंभी शिवारातील विहिरीत तरंगत असलेल्या त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस डायरीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा गावाच्या जंगलात दि.०६ डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातिल तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मयत तिघे हे हिमायतनगर तालुक्यातील टेंभी या गावातील रहिवाशी असल्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत ४६ वर्षीय शांतामन सोमाजी कावळे यांचा मृतदेह आढळून आला. तर शेजारीच त्याची ४० वर्षीय पत्नी सीमा आणि १७ वर्षीय सुजितचा मृतदेह आढळून आला होता. या माय लेकरांच्या अंगावर दगडाने ठेचून मारल्याच्या खुणा होत्या. तर याच कुटुंबातील दुसरा मतिमंद असलेला मुलगा अभिजित हा बेपत्ता झाल्याने त्याचा शोध पोलीस घेत होते.

दरम्यान दुसऱ्या दिवशी मौ. टाकराळा घटनेच्या तपासानंतर सायंकाळी तामसा पोलीस डायरीत गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शांतमन सोमाजी कावळे याच्यावर पत्नी व मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रानजंगावकर यांचे मार्गदर्शनाखाली तामसाचे सपोनि उजगीरे हे करत आहेत. दरम्यान आज दि.१२ डिसेंबर रोजी मागील काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या अभिजित शांतमन कावळे वय १९ वर्ष याचा मृतदेह टेंभी शिवारातील सिंधूबाई मधुकर कावळे यांच्या शेतीतील विहिरीत तरंगत असताना आढळून आला.

दि.१२ रोजी सकाळी शेती करत असलेला बटाईदार जांबुवंत शिंदे हे तुरीला फवारणी करण्यासाठी पाणी आणायला म्हणून विहिरीकडे गेले असता हि बाब निदर्शनास आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, तामसाचे सपोनि उजगीरे, जमादार रंगराव राठोड यांनी भेट देऊन, पंचनामा केला. तसेच याबाबत जांबुवंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बेपत्ता असलेल्या मुलाचा मृत्यू कश्यामुळे झाला, टाकराळा गावाच्या जंगलात तीन संशयास्पद मृतदेह आढळून आले… त्या घटनेशी या मुलाच्या मृत्यूशी काही संबंधी आहे काय..? अशी चर्चा होत असून, याचा तपास लावून पोलिसांना या मृत्यूच्या घटनेचे गूढ उकलावें लागणार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!