Home देश-विदेश नांदेडमध्ये पंजाब काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन -NNL

नांदेडमध्ये पंजाब काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन -NNL

Listen the News
Voiced by Amazon Polly

नांदेड| पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवल्याच्या प्रकार घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्यासमोर भाजपा महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घोषणाबाजी करून आयटीआय परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महानगराध्यक्ष प्रवीण साले म्हणाले की, पंजाबमध्ये झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षितेमध्ये हयगय करणारे पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी व्यंकट मोकले, अशोक पाटील धनेगावकर ,अनिलसिंह हजारी, सुशीलकुमार चव्हाण, प्रभू कपाटे, अकबरखान पठाण, अभिषेक सौदे यांनी आपल्या भाषणातून पंजाब सरकारचा निषेध केला.

यानंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंजाब काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात भाजपचे संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख ,केदार नांदेडकर कुणाल गजभारे, आशिष नेरळकर, मारुती वाघ ,संतोष शिरसागर, शंकर मानाळकर, राज यादव, अक्षय अमिलकंठवार, बाबुराव कासारखेडकर, संदीप पावडे, सुनील पाटील, गौरव कुंटूरकर, श्रीराज चक्रावार, रामराव पाष्टे, परीक्षित भांगे, महादेवी मठपती, कांचन ठाकूर, शिवरानी हंगरगे, चक्रधर कोकाटे, आनंद पावडे, अंकुश पार्डीकर, हुकुमसिंग ठाकूर अनेक यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अनुसुचित जाती मोर्चाच्या वतीनेही राज्यपालांना निवेदन
या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्‍या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे. देशाच्या संविधानिक पदावर असलेल्या पंतप्रधानांना 15 ते 20 मिनीटे एखाद्या उड्डाण पुलावर थांबवावे लागणे हे अतिशय निदंनिय व असमर्थनिय असून हा प्रकार घडवून आणणे म्हणजे गुन्हा आहे. भारताने यापुर्वी देखील सुरक्षा यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे दोन प्रधानमंत्री गमावलेले असून या सर्व प्रकरणात भारत सरकारने तात्काळ हस्तक्षेप करुन संबंधीतांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!