Home नांदेड ना. चव्हाणांच्या प्रयत्नाने जलस्रोतांचे होणार पुनरुज्जीवन – NNL

ना. चव्हाणांच्या प्रयत्नाने जलस्रोतांचे होणार पुनरुज्जीवन – NNL

जिल्ह्यातील पाच सिंचन तलाव दुरुस्ती अंदाजपत्रकास मान्यता

Listen the News
Voiced by Amazon Polly

नांदेड| सिंचन तलाव दुरुस्तीकरून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील २ व मुखेड तालुक्यातील ३ अशा एकूण पाच सिंचन तलाव दुरुस्ती अंदाजपत्रकास नुकतीच मान्यता मिळाली आहे यामुळे आगामी काळात या तलाव परिसरातील हेक्टर सिंचन क्षमता पुनस्र्थापित होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ना. चव्हाणांचे आभार मानले असून विकासकामांचा धडाका पाहता नांदेड जिल्हा विकास कामात अग्रेसर होईल अशी अपेक्षा जिल्हावासियांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील खडकी व धारजनी तसेच मुखेड तालुक्यातील कोटग्याळ , हिप्परगा व गोगलगाव या सिंचन तलावाच्या जलस्त्रोतांची नियमित देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर होत नाही यामुळे साठवण क्षमतेवर परिणाम होऊन ओलिताखालील क्षेत्र कमी झाले. अशा तलावांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता यास यश आले असून, ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील या पाच सिंचन तलाव दुरुस्ती अंदाजपत्रकास नुकतीच मान्यता मिळाली आहे.

यासाठी ३ कोटी ७० लाख ९१हजार २८७ रुपयाचा निधी मजूर झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण पथकामार्फत प्रगतीपथावरील, पूर्ण झालेल्या दुरुस्ती कामांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. राज्यस्तरावर व आयुक्त स्तरावर प्रकल्प कार्यान्वयन कक्षाची स्थापना करून प्रकल्पाचे संनियंत्रण केले जाईल. मुख्य अभियंता तथा सह सचिव हे प्रकल्प कर्यान्वयन कक्षाचे प्रमुख राहतील, सिंचन तलावाच्या दुरुस्तीचे कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी क्रॉस चेकींग तसेच कामाचे चित्रीकरण यामुळे कामे दर्जेदार होऊन संबधित तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे.

कोरोनाचा सामना करतानाच जिल्ह्याच्या विकासाची गती कायम रहावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले आहे यामुळे आवश्यक असलेली विविध शासकीय कार्यालये, शासकीय इमारतीना निधी , आरोग्यसेवेचे बळकटीकरण ,रस्ते -पूल आदी पायाभूत सोयी सुविधेची कामे पूर्ण करण्यात येत आहे विकासाचा हा धावता आलेख पाहता आगामी काळात नांदेड जिल्हा विकास कामात अग्रेसर होईल अशी अपेक्षा जिल्हावासियांनी व्यक्त केली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!