Home नवीन नांदेड दर्पण दिनानिमित्त सिडको शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार -NNL

दर्पण दिनानिमित्त सिडको शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार -NNL

नविन नांदेड। दर्पण दिनानिमित सिडको शिवसेनेच्या वतीने आयोजक तथा विभाग प्रमुख पप्पु गायकवाड यांच्या वतीने सिडको परिसरातील विविध दैनिकाच्या पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन शिवसेना पदाधिकारी यांच्या ऊपसिथीत करण्यात आले.

दर्पण दिनाचे औचित्य साधून ८ जानेवारी रोजी सिडको शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख गजानन राजरवार,माजी शहरप्रमुख निवृती जिंकलवाड, विभाग प्रमुख विष्णु कदम, पंडित गजभारे यांच्या ऊपसिथीत सिडको परिसरातील जेष्ठ पत्रकार रमेश ठाकूर, निळकंठ वरळे, बापुसाहेब पाटील, संभाजी सोनकांबळे, शाम जाधव, संग्राम मोरे, तिरूपती पाटील घोगरे,सांरग नेरलकर, दिंगाबर शिंदे, संजयकुमार गायकवाड, यांच्या शाल श्रीफळ व पेन देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड तर आभार आयोजक तथा विभाग प्रमुख पप्पु गायकवाड यांनी केले. या सोहळ्याला पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी दलीत मित्र माधव अंबटवार, आंनदा गायकवाड,के.एल.ढाकणीकर, देविदास इंगळे,कृष्णा गायकवाड,बाळु आढाव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!