Home निधन वार्ता पत्रकार गोपीनाथ पवार यांचे दुखः द निधन -NNL

पत्रकार गोपीनाथ पवार यांचे दुखः द निधन -NNL

उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण तांडा येथील परिसरातील सर्वांचे आवडते, मनमिळावू,शांत स्वभावाचे सामाजिक कार्यकर्ते तथा दै. लोकमतचे वार्ताहर उपसरपंच प्रतिनिधी गोपीनाथ धनाजी पवार यांचे शासकीय रुग्णालयात दि.९ जानेवारी रोजी सकाळी उपचार दरम्यान दुखः द निधन झाले.ते ४४ वर्षाचे होते.

 

त्यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ, पत्नी,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.दुपारी शिराढोणतांडा येथील स्मशानभूमीत दुपारी ३ वा.त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपीनाथ पवार हे दै.लोकमत मधून शिराढोणतांडा येथे विकास कामे करून घेतली.तांडा सुधारण्यासाठी त्यांचा सिंहांचा वाटा आहे.विविध कार्यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग असायचा.त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले,काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ,मा.सभापती बालाजी पांडागळे,शिराढोण येथील भीमाशंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक खुशालराव पांडागळे ,मा.उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पाटील कपाळे,मुक्ताराम पांडागळे,सिडको पत्रकार संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील मोरे, यांच्यासह पत्रकार मित्र, नागरिक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!