Home हालचाली मनूर येथील पोलावार यांच्या मारेकर्यांना कठोर शासन करून चौकशी अधिकाऱ्यास बडतर्फ करा -NNL

मनूर येथील पोलावार यांच्या मारेकर्यांना कठोर शासन करून चौकशी अधिकाऱ्यास बडतर्फ करा -NNL

हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मनूर येथील धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी संबंधीत दोषी असलेल्याना कडक शासन करून चौकशी अधिकार्‍यांस तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी हिमायतनगर येथील आर्य वैश्य महासभेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात दि.१० जानेवारी रोजी हिमायतनगर येथील आर्यवैश्य महासभेच्या वतीने तहसीलदार याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मनूर येथील जेष्ठ नागरिक धोंडीबा शंकर पोलावार यांनि येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून भर दिवस त्यांचा निर्घुर्ण खून करण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि स्वस्त धान्य दुकानदारास मदत करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी. कारण चौकशी अधिकाऱ्यांनी कोणताही पोलीस बंदोबस्त न देता स्वस्त धान्य दुकानदारांच्या मुलाला मदत करीत त्याचा ठिकाणी त्याला बसू दिले. त्यामुळे हा गंभीर प्रकार घडला आहे. असेही देण्यात आलेली निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे जिल्हा ग्रामीण सदस्य प्रवीण जन्नावार, श्याम नारायण मारुडवार जिल्हा ग्रामीण सदस्य सहकोषाध्यक्ष, आर्य वैश्य समाजाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुरेश शंकरराव पळशीकर आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!