Home कंधार बंधारा व तलावातील गाळ काढण्याची मागणी – NNL

बंधारा व तलावातील गाळ काढण्याची मागणी – NNL

उस्माननगर, माणिक भिसे| महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून येथील शिवारातील ठिकाणी उभारण्यात आलेल्या तलाव बंधारा यातील गाळ व नाला सरळीकरण चे काम चालू करावेत जेणेकरून पावसाचे पाणी साठविण्यास मदत होईल. यासाठी उस्मान नगर येथील कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

उस्माननगर येथील शिवारातील परिसरात बांधण्यात आलेल्या तलाव व बंधाऱ्यात वाहून आलेल्या गाळाची मातीने भरले असून पावसाळ्यात पडलेले पाणी वाहून जात आहे.जर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत बंधारा व तलावातील गाळ साफ केल्यास पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल सध्या माळावर खड्डे खोदण्यात येत आहेत. पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. कंधार तालुक्यातील उस्माननगर हे गाव पाणीटंचाईचे गाव म्हणून सर्वपरिचित आहे.

ऐन उन्हाळ्यात मे-जून मध्ये पाण्याची कमतरता भासून येत असते.नदीवरचे सिमेंट बंधारे तुटलेले आहेत त्यांच्या बांधकामासाठी व नदी मधील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर करून देण्यात यावे अशी मागणी उस्मान नगर येथील अशोक गोविंदराव काळम ,आमिनशा फकीर ,व्‍यंकटी सोनटक्के, यांच्यासह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!