Home किनवट स्मशानभुमी भींतीचे अतिक्रमण तत्काळ काढुन शेतकरी – नागरिकांना रास्ता उपलब्ध करून द्या -NNL

स्मशानभुमी भींतीचे अतिक्रमण तत्काळ काढुन शेतकरी – नागरिकांना रास्ता उपलब्ध करून द्या -NNL

सुनिल पाटील यांच्यासह शेतक-यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्याधिकारी यांची भेट

किनवट, माधव सूर्यवंशी| शहरापासुन जवळ असलेल्या ग्रामिण भागातील शेतक-यांना करिता अत्यावश्यक असलेला नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक ५ मधील डि.पी रस्त्यावरील उर्वरील स्मशानभुमीच्या भींतीचे अतिक्रमण तत्काळ काढुन तो रस्ता शेतक-यांना शेती व तत्सम बाबी करिता उपलब्ध करुन द्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील यांच्या नेतॄत्वाखालील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी किनवट यांना दिले आहे.

रबी हंगामातील शेत माल शेतातुन निघाल्या नंतर त्याची वाहतुक व पुढील हंगामाकरिता बि बियाणे व शेती औजारांची वाहतुक करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील पिंपळगाव, बेल्लोरी, कोलामखेड, या गावातील शेतक-यां करिता अत्यावश्यक असलेला रस्ता मागील महिण्यात त्यावर असलेल्या अतिक्रमण हे उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर काढण्यात आले होते तर सर्व नियमांचे पालन करुन व बाधीत नागरीकांचे नविन ठीकाणी पुर्नवसन केल्या नंतर अतिक्रमित ठिकाणावरून काढण्यात आले होते. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांच्या सदर नवीन रस्त्या संदर्भात आशा पल्लवीत झाल्या होत्या त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुनची मागणी असलेल्याने शेतक-यांना पावसाळ्यात अनंत समस्यांना तोंड देऊन आपल्या शेतामध्ये ये-जा करावी लागत होती.

अतिक्रमण कारवाई झाल्या नंतर शेतक-यांना सदर रस्ता मोकळा होईल असे वाटले होते. परंतु सदर रस्त्यावर पुर्वीच्या अतिक्रमनाला अनुसरुन स्मशान भुमीची भिंत बाधल्यागेली आहे जी कि ७/ १२ नोंदी नुसार व शासकीय दप्तरी नुसार नियोजित डि.पी रस्त्यावर अडथळा होत आहे. त्यामुळे सदर स्मशानभुमीचे अतिक्रमण तत्काळ काढुन तो रस्ता शेतक-यांना मोक़ळा करुन द्यावा अशी मागणी शेतक-यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे केली आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नांदेड चे जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण माडपेलीवार, माजी नगरसेवक रामराव ईटकेपेलीवार, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, सुनील पिसारीवार, नागेश सलाम, सुभाष चाडावार, किशनराव नेमानीवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण किनवटकर, मुकुंद नारायणराव नेम्मानिवार, संतोष नारायण नेम्मानिवार, प्रमोद जोनपेलीवार, माधव पिसारीवार, मुकुंदराव तिरमनवार, अशोक जलगमवार, मधुकर नेमानीवार, व्यंकट पोशटी, सुनीलराव आयनेनीवार, सम्राट कावळे, विनोद कावळे, दाऊ कावळे, राजू मुकुंदराव नेम्मानिवार, रामलु तुकारेडीवार, नरेश कटाटावार, देवणा भीमणवार, अक्षय दडगेलवार, किशन गंगन्ना नेम्मानिवार, नरसिंह गंगन्ना नेम्मानिवार, अशोक कावळे, राजकुमार नेम्मानिवार, अविनाश नेम्मानिवार, सतीश नेम्मानिवार, श्रीकांत दोनपल्लीवार, वेंकट इटकेपेललिवार, आशिष नेम्मानिवार, माधव पिसारिवार, कुणाल माडपल्लीवर, श्रीनिवास शेरलावार सहीत विविध ३८ शेतक-यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!