Home नांदेड राष्ट्रीय युवा दिना निमीत्त ऑडीयो जनजागृती अभियानाला प्रारंभ -NNL

राष्ट्रीय युवा दिना निमीत्त ऑडीयो जनजागृती अभियानाला प्रारंभ -NNL

नांदेड| माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो नांदेड च्यावतीने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन देश विकासात युवकांची भुमिका, कोरोना विषयी खबरदारी, स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव आदी विषयावर ऑडीयो पब्लीसीटी जनजागृती अभियानाला आज प्रारंभ करण्यात आला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या ऑडीयो पब्लीसीटी फिरत्या वाहनाला उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो चे सुमित दोडल, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे आणि अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थीती होती.

देश विकासात युवकांची भुमिका, कोरोना विषयी खबरदारी, स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव या विषयांवर प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ऑडीयो संदेशाव्दारे जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. पुढील तिन दिवस हे अभियान नांदेड शहर आणि ग्रामिण भागामध्ये राबविण्यात येणार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!