Home कंधार पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांनी जोपासावा – जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी -NNL

पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांनी जोपासावा – जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी -NNL

उस्माननगर। आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांनी सदैव जोपासली पाहिजे तसेच पत्रकारिता ही समाजोपयोगी आसावी आसे प्रतिपादन नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार अनिकेत काका कुलकर्णी यांनी केले.

याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अनिकेत काका कुलकर्णी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुढे बोलताना म्हणाले, इतरांना प्रेरणा वाटेल अशी पत्रकारिता करावी त्याकरिता वाचन, व्याकरण डोळ्यासमोर ठेवून यशस्वी वाटचाल करा असे उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. पत्रकारिता करत असतांना कोनत्याही बातमीचा अभ्यास करुनच बातमी लीहावी भाषेवर प्रभुत्व असावं व्याकरनात पारंगत व्हावे आणि पत्रकारितेशी पत्रकारांनी एकनिष्ठ असावं असे प्रतीपादन नांदेड येथील जेष्ठ पत्रकार अनिकेत काका कुलकर्णी यांनी केले.

 

ते ६ जानेवारी रोजी दर्पन दिना निमीत्त उस्माननगर पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात सत्कार प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले ऊस्माननगर चे सुसज्य पत्रकार भवन माझ्यासाठी प्रेरणा आहे. उस्मान नगर पत्रकारांच्या एकजुटीला माझा सलाम आहे.स्वातंत्र्या पुर्विची टिळक,आगरकर,आंबेडकरांची पत्रकारीता आणि आताची पत्रकारीता यात मोठा फरक आहे. सध्या जगण्याचे संदर्भ बदलले आहेत.

 

समाजासाठी ,शोशीतांसाठी,तळागाळातील माणुस जगला पाहिजे वाढला पाहिजे यासाठी सकारात्मक पत्रकारिता करावी असे अभ्यासपुर्ण विवेचन त्यांनी‌केले.पत्रकार संघाच्या वतीने स्मृतिचिन्ह शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मागील वर्षी दर्पण दिनी साप्ताहिक विवेक चे माजी संपादक श्यामराव जहागिरदार यांचा सन्मान करण्यात आला होता.पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै.मारोती डांगे यांच्या पत्नि श्रीमती प्रयागबाई व माजी अध्यक्ष कै .धम्मदिप चावरे यांच्या पत्नि श्रीमती वंदना चावरे यांचा पत्रकारपत्नी म्हणुन सन्मान करण्यात आला. समता विद्यालयाचे प्राचार्य बोदेमवाड ,पर्यवेक्षक अंबेकर, ज्योती सिरसाळार,शिराढोण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

 

शिक्षीका ज्योती सिरसाळकर यांचेकडुन पत्रकार भवनाच्या विकासासाठी दहा हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी पत्रकार विठ्ठल ताटे,संतोष कराळे,सूर्यकांत मालीपाटिल, देविदास डांगे, प्रदिप देशमुख,अमजद पठाण,धम्माजी गुंडले,संभाजी कांबळे,माणिक भिसे,गणेश लोखंडे, लक्षमण कांबळे, लक्षमण भिसे,बालासाहेब शिंदे,गोपीनाथ पवार,शुभम डांगे,शिवकांत डांगे,तेलंग ,मु अ.काळे,मु.अ. राहुल सोनसळे आदी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार मालीपाटिल यांनी केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!