Home सोशल वर्क हुजपा मध्ये मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती -NNL

हुजपा मध्ये मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती -NNL

हिमायतनगर। महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिजामातेने दोन राजांना घडवलं, नडलं आणि स्वराज्याच स्वप्न सुध्दा पाहिलं. अशा थोर मातेच्या चरणी प्रथम नतमस्तक होते. मा जिजाऊ ह्या छ. शिवाजी राजांच्या आईसाहेब होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी रोजी शिंदखेड मध्ये बुलढाणा जिल्ह्यात झाला.

 

आपल्या आईचे प्रेम, मार्गदर्शन व शिक्षणामुळे छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली. याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या आईला जाते. म्हणूनच स्वराज्यातील दोन छत्रपतिंना त्यानी आपल्या तालमीत वाढवल. त्या एक शूरवीर आईच नव्हत्या तर त्या धाडसी, निर्णयावर ठाम राहणा-या, पराक्रमी व तसेच चांगल्या पत्नी देखील होत्या. त्यांच आपल्या देशावर जीवापाड प्रेम होतं. त्या प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करुन त्यातून मार्ग काढत असत. असे मार्मिक भाष्य डॉ. बोंढारे सविता यांनी केले.

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतीक विभागाच्यावतीने महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप माने सर हे होते. तर मंचावर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. सविता बोंढारे ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शिवाजी भदरगे तसेच डॉ. एल. बी. डोंगरे व श्री. संदीप हारसूलकर डॉ. के. बी. पाटील आदी लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ व तसेच युवकांचे बलस्थान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांनी पूजन करून त्यांना अभिवादन आले.

 

पाहुण्यांच्या स्वागता नंतर संयोजकांनी प्रास्ताविक मांडले. तसेच या कार्यक्रमात बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, देशातील युवकांचे बलस्थान असलेले स्वामी विवेकानंद यांनी आपल्या ‘बंधू आणि भगिनींनो’ या दोनच शब्दांच्या वाणीने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. खर्या अर्थाने त्यांच्या विचारांची आजच्या तरुण वर्गाला नितांत गरज आहे. त्यांनी सनातन विचारधारेचा प्रचार केला. व तसेच रामकृष्ण मठाची स्थापना करून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे ओळख करून दिली. ते सुंदर गीत गात होते.

 

खेळातही निपुण होते त्यांच्याकडे विलक्षण बुद्धीमत्ता असल्यामुळे चौफेर ज्ञान व नेतृत्व गुण त्यांना लाभले होते. ते पहिल्या आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष होते. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांची जिद्द, अभ्यासू वृत्ती अंगीकारली पाहिजे म्हणूनच आज आपण त्यांची जयंती ‘युवा दिन’ म्हणून साजरी करतो. त्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावा. असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. के. बी. पाटील यांनी केले. शासनाने घालून दिलेल्या कोव्हीड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. 

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!