Home खास न्यूज राजमाता जिजाऊ सृष्टी ठरेल नांदेडच्या विकासात सुवर्ण पान -पालकमंत्री अशोकराव चव्हाण -NNL

राजमाता जिजाऊ सृष्टी ठरेल नांदेडच्या विकासात सुवर्ण पान -पालकमंत्री अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड,अनिल मादसवार| राजमाता जिजाऊ सृष्टी ठरेल नांदेडच्या विकासात सुवर्ण पान असे प्रतिपादन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. शहराच्या हनुमानगड, जानकी नगर येथील प्रगतीपथावर असलेल्या जिजाऊ सृष्टी उद्यान स्थळी बुधवार दि १२ जानेवारी रोजी राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते.

व्यासपीठावर विधानपरिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत ,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,जि . प. अध्यक्षा सौ मंगारानी अंबुलगेकर ,महापौर सौ.जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी ,माजी महापौर सौ शैलजाताई स्वामी , माजी उपमहापौर आनंद चव्हाण ,जि. प. सभापती बाळासाहेब रावणगावकर, महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक अविनाश कदम ,रेखा पाटील, सुरेखा रावणगावकर, पंजाबराव काळे, दशरथ कपाटे, शिवाजी पावडे ,स्वप्नील तळणीकर, चांदूजी सूर्यवंशी , गजानन सावंत, आदींची उपस्थिती होती .

यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की ,राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला हीच भूमिका घेऊन काँग्रेसपक्ष काम करत आहे ,मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरूच आहेत. आरक्षणाचा प्रश्नही सुटावा यासाठीही पाठपुरावा करण्यात येत आहे नांदेडचा विकास निरंतर सुरु आहे .

जिजाऊ सृष्टी उद्याना साठी जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी २० लाखाचा निधी देण्यात आला आहे ही जिजाऊ सृष्टी विकासात सोनेरी पान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी शहरात हनुमानगड, जानकी नगर येथे मोकळ्या जागेवर जिजाऊ सृष्टी उद्यान उभारण्यात यावे अशी मागणी आपण पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली होती यानंतर मनपा सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता याची आठवण काढत थोर राजमाता जिजाऊंच्या या नवीन सृष्टीतून भावी पिढीला देशभक्तीची सतत प्रेरणा मिळत राहील असे सांगितले . सूत्रसंचलन संतोष देवरायें तर उपस्थितांचे आभार महापालिकेचे गिरीश कदम यांनी मानले हा अभिवादन सोहळा कोरोना नियमांचे पालन करत संपन्न झाला .

शहरात साकारतेय राजमाता जिजाऊ सृष्टी
शहराच्या हनुमानगड, जानकी नगर येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून राजमाता जिजाऊ सृष्टी { उधान ] साकारली जात आहे यासाठी करोडोचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून हे काम प्रगतीपथावर आहे . ही राजमाता जिजाऊ सृष्टी शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!