Home खास न्यूज संतबाबा कुलवंतसिंघजी यांची गुरुद्वाराच्या जत्थेदार पदावर 22 वर्षें सेवा पूर्ण -NNL

संतबाबा कुलवंतसिंघजी यांची गुरुद्वाराच्या जत्थेदार पदावर 22 वर्षें सेवा पूर्ण -NNL

नांदेड। श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे शेवटचे स्थान, पाच धार्मिक पीठापैकी एक प्रमुख तखत आणि आणि अकरावे गुरु श्री गुरु ग्रंथसाहबजी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भव्य – दिव्य दरबार साहेबात संतबाबा कुलवंतसिंघजी यांची जत्थेदार पदावर सेवेची बावीस वर्षें पूर्ण झाली आहेत. दि. 13 जानेवारी, 2022 संतबाबा कुलवंतसिंघजी सेवेच्या 23 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांनी येथे दिली आहे. 

 

नांदेड येथील तखत सचखंड हजूरसाहेब हे धार्मिक स्थल शीख धर्मियांसाठी ऊर्जास्थान आहे. या ठिकाणी दि. 12 जानेवारी, 2000 रोजी तत्कालीन जत्थेदार संतबाबा हजूरासिंघजी धूपिया बाबाजी अस्वस्थ होऊन त्यांचे देहावसान झाल्यामुळे रात्रीच्या वेळी तखत साहेब येथे मुख्य जत्थेदार म्हणून संतबाबा कुलवंतसिंघजी सेवेत दाखल झाले होते. मागील 22 वर्षें संतबाबा कुलवंतसिंघजी जत्थेदार पदावर सेवा देत असून देशातील शीख धर्मियांच्या इतर तखतांच्या तुलनेत हजूर साहेब नांदेड येथील विद्यमान तखत सचखंड श्री हजूर साहेब येथे जत्थेदार पदाची सेवा खूपच कठीण स्वरूपाची आहे. येथे ठरवून दिलेल्या वेळेवर निश्चित सेवेसाठी जत्थेदाराची उपस्थिती असणे नियम आहे.

 

पहाटे 3 वाजता सुमारास जत्थेदाराला गुरुद्वाराच्या सेवेत दाखल व्हावे लागते. सामान्य व्यक्तीसारखी जत्थेदाराच्या नशिबी सलग सहा तास झोप घेणे कधीच शक्य नसते. श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या पवित्र सिंहासन गृहाची नियमित सेवा ठरलेल्या पारंपरिक नियमाने करावी लागते. प्रतिदिन नव्याने सर्व शस्त्रांची सजावट केली जाते. सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी काही सेवा (पूजाविधी) ठरलेल्या आहेत. येथे प्रतिदिन श्री गुरु ग्रंथसाहेब यांच्या प्रकाशापासून सुखासन अवस्थेपर्यंत दरबार साहेबच्या विविध सेवांचे संचालन जत्थेदार साहेब यांच्या मार्गदर्शनात व आदरणीय पंजप्यारे साहिबान यांच्या सहकार्याने पार पाडले जातात. एकूणच नांदेडच्या तखत साहेब येथे व्यस्त अशा पारंपरिक सेवा आहेत. त्यांना पार पडण्याची जवाबदारी त्यांच्या कार्यक्षेत्रात असते. येथे तखतच्या जत्थेदारांच्या रूपात दीर्घकाळ सेवा करणाऱ्या जत्थेदारांच्या यादित संतबाबा कुलवंतसिंघजी यांचे स्थान पाचवे आहे.

 

अधिक काळ सेवा अर्पण करणाऱ्या ज्येष्ठ जत्थेदारांच्या यादित संतबाबा चढतसिंघ 50 वर्षें, संतबाबा हीरासिंघ 26 वर्षें, संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी 25 वर्षें आणि संतबाबा मानसिंघजी 23 वर्षें आपली सेवा बजावलेली आहे. संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या सेवेत असतांना श्री गुरु ग्रंथसाहेब गुरुतागद्दी त्रिशताब्दी सारखा विहंगम भव्य दिव्य सोहळा संचालित केला. बाबाजींच्या कार्यकाळात अनेक शताब्दी धार्मिक सोहळे देखील साजरे झालेत. येथील सेवेची तत्परता आणि धार्मिक महत्व संपूर्ण जगापर्यंत विस्तारित झाले. तीन वर्षांपूर्वी इंग्लैंड येथील एका संघटनेने बाबाजींना जगातील सर्वात शक्तिशाली शीख म्हणून उपाधि देखील घोषित केली होती. संत बाबा कुलवंतसिंघजी बाबाजी यांना श्री गुरु गुरु गोबिंदसिंघजी महाराजांची सेवा करण्यासाठी सतत ऊर्जा मिळत राहावी. त्यांच्या सेवेच्या रूपात कीर्ति घडवून यावी अशी सदिच्छा. बाबाजींच्या आई मातोश्री संत कौर जी आणि कडेवाले कुटुंबियासाठी हा दिवस खूपच महत्वाचा आहे.  

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!