Home नांदेड ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा शाखा नांदेड तर्फे स्वामी विवेकानंद जयंती संपन्न -NNL

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा शाखा नांदेड तर्फे स्वामी विवेकानंद जयंती संपन्न -NNL

नांदेड| देव देवळात नाही तर जनसामान्यात राहतो, जनसेवा हीच ईश्वर सेवा’ असे सांगणार्‍या, तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अधिष्ठान असलेल्या स्वामी विवेकानंदांची जयंती दि. 12 जानेवारी 2021 रोजी चिखलवाडी येथील सिताराम मंदिरात दु. 12.30 वा. ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा नांदेड तर्फे संपन्न झाली.

स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजन केल्यानंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी स्वामी विवेकानंद आणि ग्राहक पंचायत या विषयी सुरेख मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नांदेड जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग खुमासदार शैलीत सांगून सर्वांना प्रफुल्लित केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नांदेड महानगरचे संघटक श्री प्रशांत वैद्य यांनी थोर विचारवंतांची, स्वामी विवेकानंदांबद्दलची मतं वाचून दाखवली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, औरंगाबाद विभागाचे संघटक इंजि. बालाजी लांडगे यांनी प्रथेप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने संघटनेसाठी “समर्पण निधी” साठी सर्वांना आवाहन केले. आभार प्रदर्शन व पसायदानानंतर जल पानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सदरील कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष, डॉ. विजय लाड, प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, इंजि. बालाजी लांडगे. अरविंद बिडवई, प्रशांत वैद्य, एडवोकेट दिपाली डोणगावकर एडवोकेट राजेश्वर कमटलवार, पुरुषोत्तम जकाते, इंजि. महेंद्र मठमवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!