Home भोकर जिल्हाधिकार्‍यांनी दिली वस्तीगृह व सभागृह जागेस भेट -NNL

जिल्हाधिकार्‍यांनी दिली वस्तीगृह व सभागृह जागेस भेट -NNL

आदिवासी समाज शिष्टमंडळाच्या कार्यास यश

भोकर। येथे आदिवासी समाजाच्या मागणीनुसार व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार दि.१२ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे,तहसीलदार राजेश लांडगे, समन्वयक गंगाधर वानोळे,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भोकर येथे भेट देऊन आदिवासी मुलींच्या नियोजित वस्तीगृह जागेस भेट देऊन वन, आदिवासी विकास, महसूल व बांधकाम विभागास गतीने कार्य करण्याचा सूचना दिल्या आहेत. आदिवासी समाज शिष्टमंडळाने यासाठी आग्रह धरला होता.


उपसभापती नागोराव कोठूळे, सरपंच प्रतिनिधी राजू बुलबुले, सेवानिवृत्त तहसीलदार डी. के.डुकरे, बिरसा ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष यशवंतराव वानोळे,माजी उपसरपंच आनंदराव वानोळे, लोभाजी झाडे, माजी ग्रा.पं.सदस्य बालाजी खुपसे, माजी ग्रा.पं.सदस्य मारोती वागतकर, ग्रा.पं.सदस्य यादव ढोले, रामचंद्र टारपे, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी सोनबा कोठूळे, आदिवासी समाज शिष्टमंडळाचे समन्वयक गंगाधर वानोळे, माजी सरपंच गणपती वागतकर, उपसरपंच सुदाम टारपे, सरपंच दुर्गादास राठोड, चंद्रकांत डाकोरे, दिगंबर हुरदुके, माजी सभापती शिवाजी देवतळे, सरपंच जयवंतराव खुपसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारोती खुपसे, उपसरपंच आदिनाथ वागतकर, सरपंच दिगंबर वाकेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंपतराव मेंडके, सरपंच प्रतिनिधी संदीप बोथिंगे, उपसरपंच शेषेराव हुरदुखे,ग्रा.पं.सदस्य रामराव मेंडके, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी डॉ.नारायण डाखोरे, माजी ग्रा.पं.सदस्य गणेश मेंडके,उपसरपंच नागोराव झाडे, सरपंच रामदास जोंधळे यांच्यासह लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्पूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आदिवासी भागातील सर्व लोकप्रतिनिधी व आदिवासी शिष्टमंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,तहसीलदार राजेश लांडगे यांनी बैठक घेऊन सांस्कृतिक सभागृह जागेबाबत विचारविनिमय केला. वाकद येथे एक सभागृह बांधण्याचे निश्चित केले असून उर्वरीत एक सभागृह बोरवाडी या मोठ्या गावात बांधकाम करावे असे गंगाधर वानोळे यांनी सुचवले, गारगोटवाडीचे माजी सरपंच गणपती वागतकर, उपसभापती नागोराव कोठूळे यांनी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अधिकरी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत भोकर येथील वस्तीगृह जागेस व वाकद येथील सभागृह जागेस भेट देऊन पाहणी केली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!