Home राजकीय जिल्हा परिषद निवडणुक जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – खा. चिखलीकर -NNL

जिल्हा परिषद निवडणुक जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – खा. चिखलीकर -NNL

लोहा| जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे बूथ पातळीवर संघटन मजबूत झाले पाहिजे. लोहा कंधार तालुक्यातील सर्व बारा जिप. जागा जिकण्याची आता पासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच पंतप्रधान मोदीजी यांनी जे लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. ते लोकां र्यन्त बूथ कमिटी, शक्ती केंद्र यांनी पोहचविले पाहिजे. या दोन्ही तालुक्यातील जनतेची सध्या दिशाभूल केली जात आहे. पण मतदार खूप जागरूक आहे. एकदा झालेली चूक आता पुन्हा नाही असे नाव न घेता आ शिंदे यांना सूचक इशारा दिला. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे मार्गदर्शन जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा ग्रामीण बुथ ग्रेडेशन अभियान संदर्भात लोहा कंधार तालुक्यातील बूथ कमिटीच्या बैठकिसाठी जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, जिल्हा सरचिटणीस युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम , युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, महिला जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे, तालुकाध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष भगवान राठोड, कंधारचे उपनगराध्यक्ष जफरउद्दीन बहोद्दीन, माजी नगराध्यक्ष शहर प्रमुख किरण वट्टमवार, सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड उपसभापती बळीराम पाटील माजी उपनगराध्यक्ष रामराव सुर्यवंशी, गटनेता करीम शेख, ओबीसी तालुकाध्यक्ष अर्जुन राठोड, भायुमो तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाळू पाटील कदम, यासह मोठ्या संख्येनी दोन्ही तालुक्यातील बूथ व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.

बूथ ग्रेडशन अभियाना \ला मार्गदर्शन करताना खा चिखलीकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व जि प गट निहाय बाईक घेण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहू असे नमूद करीत कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व भाजप सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती लोकांना द्यावी. लोहा कंधार तालुक्यातही जी कामे मंजूर आहेत ती होणे नाही याबाबत दिशाभूल सुरू आहे. अडीच वर्षा पूर्वी जी चूक झाली ती आता होणार नाही. या दोन्ही तालुक्यातील बारा जि प गटात भाजपा उमेदवार विजयी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विभागीन संघटन मंत्री संजय कौडगे यांनी पक्ष कार्यकर्त्याना सविस्तर मार्गदर्शन केले. युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी मतदार संघात येत्या काळात कार्यकर्त्यांनी जि प व प स ताब्यात घेण्यासाठी सज्ज राहावे संगीतले अभ्यासपूर्ण भाषण केले.चित्ररेखा गोरे, लक्ष्मणराव ठककरवाड यांनी मार्गदर्शन केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!