Home क्राईम न्यायालयीन आदेशाचे उल्लंघनः अधिकार्‍यावर कारवाई करा -NNL

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघनः अधिकार्‍यावर कारवाई करा -NNL

शासकीय औद्योगीक कामगार संघटनेची मागणी

नांदेड| जालना येथील औद्योगीक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन करणार्‍या सामाजिक वनीकरण विभागातील भोकरच्या लागवड अधिकार्‍यावर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दि.17 जानेवारी पासून धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय औद्योगीक कामगार संघटनेने सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे यांना दिलेल्या एका निवेदनात दिला आहे.

सामाजिक वनीकरण विभागातील मुखेड व भोकर येथे काम करणार्‍या कायम रोजंदारी कामगारांच्या सेवा खंडीत करु नये, असे अंतरिम आदेश जालना येथील औद्योगीक न्यायालयाने दिले असतांना द्वेष बुद्धीने मुखेड वनीकरण विभागातील पाच कामगारांना कामावरुन कमी केले. तर याच कारणाने भोकर परिक्षेत्रातील कामगारांचे पगार बेकायदेशीर सुडबुद्धीने अदा केलेले नाहीत.

याबाबत संघटनेच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार, चर्चा केल्यानंतरही हेकेखोर अधिकार्‍यांनी कामगारांना न्याय दिला नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने सोमवार दि.17 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.अब्दुल गफार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!