Home नांदेड नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद अभियानाला प्रारंभ- NNL

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद अभियानाला प्रारंभ- NNL

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दिपक शेडे यांची माहिती

नांदेड| मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पक्ष बांधणीसंदर्भात नुकतेच आवाहन केल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे नांदेड दक्षिण विधानसभा संपर्क प्रमुख दिपक शेडे यांनी दिली आहे.

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या संवादात पक्ष बांधणीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात आता शिवसंवाद अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.

या अंतर्गत गावपातळीवर शिवसेनेची पक्षबांधणी, महानगरपालिका आणि सिडको-हडको क्षेत्रात प्रभागनिहाय मोर्चेबांधणी तसेच शिवसेनेच्या शाखा स्थापन करणे हा या शिवसंवाद अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे नांदेड दक्षिणचे विधानसभा संपर्क प्रमुख दिपक शेडे यांनी सांगितले. या भागाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, सिडको-हडकोचे शहरप्रमुख गजानन राजूरवार, उध्दव शिंदे, बाबुराव मोरे, शेषेराव दिघे, शाम वानखेडे, शैलेश रावत आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सामील झाले आहेत.

या अभियानातंर्गत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहंचतात किंवा नाही त्याबद्दल येणाNया अडचणी, कागदपत्रांची पूर्तता याचीही माहिती या अभियानातंर्गत घेण्यात येणार आहे. शासनाच्या योजना घराघरात पोहंचविण्यासाठी व त्या समजावून सांगण्यासाठी शिवसैनिकांनी आता वंâबर कसल्याचे दिपक शेडे यांनी सांगितले. या अभियानातंर्गत शिवसेना नोंदणी, शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या, बुथनिहाय पाहणी, नव्या बुथप्रमुखांच्या नियुक्त्या, याबाबतचीही माहिती संकलित करण्याच्या सूचना दिपक शेडे यांनी कार्यकत्र्यांना दिल्या आहेत. निश्चितच हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!