Home नांदेड डॉक्टर हणमंत धर्मकरे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी -NNL

डॉक्टर हणमंत धर्मकरे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी -NNL

विविध सामाजिक संघटनांची मागणी

नांदेड| उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
नांदेड येथील मूळ रहिवासी असलेले व उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर हनुमंत धर्मकरे यांची दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेल्यावर सुद्धा मारेकरी अद्याप फरार असून तपास अतिशय संथ गतीने सुरू असल्याची तक्रार विविध सामाजिक संघटनांची आहे. सदरील प्रकरण अतिशय गंभीर व माणुसकीला काळिमा फासणारे असून सामाजिक संघटनांकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या प्रकरणाचे सूत्रधार असणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करू करून त्यांना तात्काळ गजाआड करण्यात यावे, मयत डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या पत्नीस शासकीय सेवेत रुजू करण्यात यावे. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे श्याम कांबळे, लोकस्वराज्य आंदोलनाचे रामचंद्र भरांडे, बसपाचे जिल्हा प्रभारी लोकेश कांबळे, आर पी एफ सामाजिक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनोज कुमार वाघमारे, मोहन यादव, शिवसेना उपशहरप्रमुख राहुल तेलंग, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम गवाले, पंचायत समिती सदस्य नामदेव कांबळे , अनुसूचित जाति मोर्चा भाजपाचे गंगाधर कावडे,
लोकस्वराज्य आंदोलनाचे अर्जुन गायकवाड , गंगाधर जाधव, संदीप मेटकर, सचिन सर्जे, अशोक गारोळे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले, वंचीतचे दीपक कसबे, उत्तम मोगले आदींची उपस्थिती होती. उमरखेड येथील डॉक्टर हणमंत धर्मकरे यांच्यावरील हा भ्याड हल्ला व निर्घृण केलेली हत्या माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. लवकर या प्रकरणातील हत्याऱ्याना व सूत्रधारांना अटक केली गेली नाही तर विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. सदरील निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री , गृहमंत्री, आरोग्यमंत्री, विरोधी पक्ष नेता , जिल्ह्याचे पालकमंत्री , सामाजिक न्याय मंत्री, नांदेड लोकसभेचे खासदार, नायगाव विधानसभेचे आमदार, पोलीस महासंचालक महाराष्ट्र आणि पोलीस अधीक्षक नांदेड आदींना देण्यात आले आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!