Home कंधार कंधार पं.स.च्या प्रांगणात कै.माधवराव पा.पांडागळे यांचे स्मारक व्हावे -NNL

कंधार पं.स.च्या प्रांगणात कै.माधवराव पा.पांडागळे यांचे स्मारक व्हावे -NNL

उस्माननगर, माणिक भिसे। लोहा – कंधार विधानसभेचे लोकनेते तथा सभापती नावाने सुपरिचित आसलेले कै. माधवराव पाटील पांडागळे साहेबांचे कार्य अतुलनीय आहे.

 

तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणीत ते कायम धावून यायचे , प्रसंग कोणताही आसो पांडागळे साहेब नेहमी सामान्य माणसाच्या पाठिमागे भक्कमपणे उभे राहत . समाजकारण करतांना त्यांनी कधी राजकारणाचा आणि पक्षाचा आडसर येऊ दिला नाही. अशा सामान्य माणसाच्या नेतृत्वाच्या कार्याचा विचार करून कंधार पंचायत समितीने पंचायत समितीच्या प्रांगणात लोकनेते , आजन्म सभापती या नावाने परिचित लोकनेते कै. माधवराव पाटील पांडागळे साहेबांचे स्मारक बनवून त्यांच्या कार्याचा गौरव करावा.

 

अशी मागणी मनोहर पाटील चिखलीकर , सचिन पा.पेठकर , अजिंक्य पांडागळे , रत्नदिप वाघमारे , सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कहाळेकर , ज्ञानेश्वर गंदलवाड , निरंजन वाघमारे , दिपक पाटील , नवनाथ भालेराव , नितीन करेवाड , योगेश पाटील यांनी कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मांजरमकर साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!