Home आरोग्य वार्ता “सुरकंद ची भाजी.. .बाजरीच्या भाकरी अन जिव्हाळा -NNL

“सुरकंद ची भाजी.. .बाजरीच्या भाकरी अन जिव्हाळा -NNL

नांदेड। कार्यकर्ता हा खा चिखलीकर व कुटुंबियांचा जीवप्राण ..आणि प्रतापराव व त्यांचे कुटुंब हे सुद्धा कार्यकर्त्यासाठी जीवप्राणच…इथे जिव्हाळ्याचे संबंध वृद्धीगत झाले ..तिळा प्रमाणे स्नेह वाढला ..आणि गुळा सारखा गोडवा सत्ता असो वा नसो तो कायम टिकला नव्हे तो वाढत गेला.…हे राजकारणाच्या पल्याड असलेले जिव्हाळ्याचे नाते..!

संक्रांतीचा पूर्व दिवस भोगी . त्याच दिवशी सुरकंद ची भाजी , सोबत बाजरी ची भाकरी ..असा खास मेनू होता . स्वतः खा चिखलीकर आग्रह करत होते तर युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर – . सचिन पाटील चिखलीकर हे भाऊ स्वतः पंगतीत जेवण वाढत होते.. तीळ अन ..गुळा प्रमाणे… प्रेमाचा.. आपुलकीचा हा दुर्मिक योग कार्यकर्त्या साठी तसा अविस्मरणीयच ठरला.

शक्ती केंद्र व बूथ कार्यकर्त्याची बैठक .. तशी कोरोना नियमांचे पालन करत पार पडली. . जिल्ह्याचे खा . प्रतापराय पाटील चिखलीकर , संघटन मंत्री संजय कौडगे , उच्चेगावकर, ठक्करवाड यासह मान्यवर उपस्थित होते बैठक संपली की कार्यकर्त्या साठी जेवणाची व्यवस्था नेहमीच असते . , संक्रांतीचा पूर्व दिवस भोगी चा असतो.याच दिवशी प्रविण पाटील चिखलीकर यांनी ‘ खास ‘ सुरकंद ची भाजी व बाजरीची भाकरी असा चवदार मेनू बनवायला सांगितलं होतं.

तिळाचा मान म्हणून भाकरीत तीळ टाकले होते दुपारी ‘ कार्यकर्त्यांनी सामूहिक भोजन केले स्वाद . चिखलीकर साहेब स्वतः भोजन स्थळी कार्यकर्त्यांत बसून होते .दुसरीकडे स्वतः युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर व सचिन पाटील चिखलीकर हे बंधू कार्यकर्ते याना जेवन वाढत होते . शूरकंद या स्वादिष्टभाजीचा स्वाद कार्यकर्त्या सोबत प्रवीण पाटील यांनीही घेतला.. , कार्यकर्त्यांवर किती जीवापाड प्रेम आहे हे अधोरेखित झाले .हा जिव्हाळा चिखलीकर कुटुंबियांची मोठी ताकद होय.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!