Home मुखेड मुखेड/कंधार विधानसभा मतदार संघाच्या दहा गावात लवकरच राष्ट्रीयकृत बँका होणार – आ. डॉ.तुषार राठोड -NNL

मुखेड/कंधार विधानसभा मतदार संघाच्या दहा गावात लवकरच राष्ट्रीयकृत बँका होणार – आ. डॉ.तुषार राठोड -NNL

मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुका हे विस्ताराने मोठा तालुका असुन १०५ वाडी, तांडे १४० महसूली व १२८ ग्राम पंचायती आहेत. यातच मुखेड विधानसभा मतदार संघास कंधार तलुक्यातील अडीच सर्कल (अंदाजे ६० गावे) जोडल्याने हा मतदार संघ विस्ताराने खुप वाढला आहे.

मतदार संघातील मुखेड व कंधार तालुक्यातील गावात अनेक खाजगी शैक्षणिक संस्था असुन मतदार संघाची लोकसंख्या ४ लाखाच्या वर आहे. खालील गावात बँक शाखा स्थापन झाल्यास ग्रामीण भागात लघु उद्योगाला चालना मिलनार आहे. 

 तालुक्यातील मुक्रमाबाद, बारहाळी, जांब, बेटमोगरा येथे उपबाजार पेठा आहेत. विस्ताराने मोठा असलेल्या तालुक्यातिल ग्रामीण भागात राष्ट्रियकृत बैंकेचा अभाव असल्याने तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, खजगी व जि.प शिक्षक, शासकीय कर्मचारी, निवर्त कर्मचारी, शालेय विधार्थी, आदिसह निराधार, जेष्ठ नागरिकांची खाती शाहरातील बँकेत आहेत. हे सर्व मुखेड शहरातील राष्ट्रीयकृत बँकेत गर्दी करत असतात व वरील सर्वांचे खाती शहरातील स्टेट बॅंक इंडिया, सेंट्रल बॅंक व बडोदा बँकेत खाती आहेत.

 

वरील बँकेत हजारो खाती असुन बँकेत अत्यल्प कर्मचारी संख्या असल्याने व शेतक-यांचे पिककर्ज खातेही याच बँकेत असल्याने बँकेत मोठी गर्दी असते खाती जास्त व व कर्मचारी वर्ग कमी असल्याने कर्मचा-यावर कामाचे तान पडत असते वेळेवर काम होत नसल्याच्या तक्रारी होत असतात ग्रामीण भागातुन येना-या शेतकरी व जेष्ठ नगरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने आ. डॉ तुषार राठोड यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे मतदार संघातील जांब, सावरगाव पी., येवती, पाळा, दापका गुडोंपत, एकलारा, सावरमाळ तालुका मुखेड. पेठवडज, अंबुलगा, गोणार तालुका कंधार येथे भारतीय स्टेट बैंकच्या नवीन शाखा स्थापन करण्याची मागणी केली होती. 

आ‌.डॉ तुषार राठोड यांच्या मागनीची तात्काल दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री कराड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र पाठवून आमदार राठोड यांनी पाठवलेला प्रस्ताव डीएलबीसी कडून मंजूर करून घेवून वरील गावात एस. बी. आय. शाखा स्थापन करण्यासाठी एसएलबीसी कडे मंजूरीसाठी त्वरित पाठण्याच्या सूचना आदेशित केले असुन केलेल्या कारवाईचा अहवाल त्वरित फायनस मंत्रालयाकडे पाठवण्याचे आदेशित केले आहे. 

आ. डॉ तुषार राठोड यांच्या प्रयत्नाने या गावचा व परिसरातील गावचा बॅंक प्रश्न मार्गी लागणार असल्याने मतदारसंघातील शेतकरी,विद्यार्थी, लघु उद्योजक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी, बचत गटाच्या महिला व जेष्ठ नागरिकांनी आमदार राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुन्हा एकदा प्रशंसा करुन अनेकांनी अभिनंदन केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!