Home कंधार खा.प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून राजेश्‍वर कांबळे यांचा सत्कार -NNL

खा.प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून राजेश्‍वर कांबळे यांचा सत्कार -NNL

कंंधार। येथील प्रतिभावंत तथा प्रभावशाली पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा २०२१ या वर्षांचा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सायंकाळी ६ वाजता कंधार येथील साईसागर संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.चित्ररेखा गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, प्राचार्य किशनराव डफडे, माजी जि.प.सदस्य दत्तात्रय चंदनफुले, माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, सौ.वंदनाताई डुमणे, मधुकर पाटील डांगे, मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, नवनाथ पाटील तोरणे, निलेश गौर, शंतनु कौलासे, अॅड.सागर डोग्रजकर, रजत शहापुरे, अविनाश गित्ते, बळवंत कौसल्ये, हणमंत डुमणे, महेश गोरे, कदम सर, सतिश कांबळे आदी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!