Home नांदेड कोरोना नियमाना बगल देऊन शिकवणी घेणाऱ्याकडून ९५ हजारांचा दंड वसूल – NNL

कोरोना नियमाना बगल देऊन शिकवणी घेणाऱ्याकडून ९५ हजारांचा दंड वसूल – NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यात कोरोनाच उद्रेक वाढू लागला असताना देखील अनेक कोचिंग क्लासेसवाल्यानी आपला शिकवणीचा धंदा सुरू ठेवला आहे. आज नांदेड महानगरपालिकेने शहरातील ४ कोचिंग क्लासेसची तपासणी केल्यानंतर कोरोना नियमाला बगल देणाऱ्या त्या कोचिंग क्लासेसवाल्यांकडून ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

आजघडीला वातावरनातं झालेल्या बदलामुळे बहुतांश नागरिक कोरोनाच्या काचयात येत आहते. त्यामुळे कोरोनाचा एकदा वाढू नये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. मात्र नियमावलीच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नांदेडमध्ये शिकवणी वर्ग घेणाऱ्याकडून एकच ठिकाणी अनेकांना बसून शिक्षण देत आहेत. याबाबतची तपासणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे उप आयुक्त अजितपालसिंघ संधू, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, डॉ.मिर्जा फरहतुल्लाह बेग, रमेश चवरे,डॉ.रईसोद्दीन अविनाश अटकोरे,सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांनी आरसीसी कोचिंग क्लासेस, शांभवी कोचिंग क्लासेस, दरक कोचिंग क्लासेस, सलगरे कोचिंग क्लासेस अश्याया ४ क्लासेसची तपासणी केली.

यावेळी येथे कोरिया नियमांना केराची टोपली दाखऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण दिले जात असल्याचे निदर्शनास आले. यावरून मनपाच्या पथकाने आरसीसी कोचिंग क्लासेस ५००००/-, शांभवी कोचिंग क्लासेस २५०००/- , दरक कोचिंग क्लासेस १००००/- , सलगरे कोचिंग क्लासेस १००००/- असा एकूण ९५०००/- रुपयाचा दंड ठोठावून वसूल केला आहे. यामुळे खाजगी कोचिंग वाल्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अश्या प्रकारे कोणीही कोरोना नियमावलीचे उल्लंघन करू नये अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असा इशारा मनपा प्रश्नाने दिला आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!