Home निधन वार्ता केंद्रीय मुख्याध्यापक प्रदीप सोनकांबळे सर यांचे हृदयविकाराने निधन -NNL

केंद्रीय मुख्याध्यापक प्रदीप सोनकांबळे सर यांचे हृदयविकाराने निधन -NNL

लोहा| जूना लोहा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रांचचे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख प्रदीप नामदेवराव सोनकांबळे सर यांचे दि.13 रोजी दुपारी हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.

ते नेहमी प्रमाणे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रांच लोहा येथे कामानिमित्त येऊन काही शाळेच्या कामानिमित्त बाहेर पडले असता त्यांना अस्वस्थता जाणवले आणि ते घराकडे गेले नंतर हॉस्पिटलला गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्युसमयी ते 55 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.14 रोजी सकाळी 10 वाजता मारवाडी स्मशानभूमी लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मूळ मंग्याळ ता. मुखेड येथील रहिवाशी मात्र नोकरीच्या निमित्ताने ते कांहीं वर्षांपासून लातूर येथे स्थिरावले होते.

प्रदीप सोनकांबळे यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ योगदान दिल्या बद्दल त्यांना राजर्षी शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. प्रामाणिक, मनमिळाऊ, शांत, संयमी, गुणी, स्वाभिमानी, शिस्त व शिक्षकप्रिय अध्यापक असा त्यांचा नाव लौकिक होता. त्यांच्या अकाली निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!