Home करियर ग्रामीण भागातील शाळा अर्ध्या क्षमतेने शाळा सुरू करण्यासाठी मेस्टा ची मागणी – सुदर्शन शिंदे -NNL

ग्रामीण भागातील शाळा अर्ध्या क्षमतेने शाळा सुरू करण्यासाठी मेस्टा ची मागणी – सुदर्शन शिंदे -NNL

लोहा| महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्र सोडून प्रत्येक व्यवसाय नियम व निर्बंधा ची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली मात्र शाळांना वगळण्यात आले. आता एक महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होत असून सरकारने शाळा सुरू कराव्यात ही आमची आग्रही मागणी मेस्टाचे मराठवाडा उपाध्यक्ष व लोहा येथील सह्याद्री स्कूल ऑफ इन्स्टिट्यूशन चे संचालक सुदर्शन शिंदे, यांनी केली आहे

मेस्ता या संघटनेच्या वतीने शाळा सुरू कराव्यात या बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी उमाटे, समन्वयक भारत होकर्णे, सचिव राजकुमार घोडके, मराठवाडा उपाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन दिले. निवेदनात शिक्षण क्षेत्राबाबत प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा पूर्ववत सुरू ठेवाव्यात अशी विनंती केली आहे. नांदेड जिल्ह्यात खाजगी फिस बेसिस वर चालणाऱ्या शाळा साधारणपणे दोन एकर च्या परिसरात आहेत. शाळांमध्ये वर्ग खोल्यांची संख्या, खेळाचे मैदान ही पुरेसे मोठे आहे.

मागील दोन वर्षापासून शाळा बंद आहेत, मागील एका महिन्यापासून मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणे हा प्रॅक्टिकल कठीण विषय आहे कारण प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल नाही आणि ज्यांच्याकडे आहे तो वडिलाकडे असतो. ऑनलाइन शिक्षणा च्या वेळेत वडील घरी नसतात. तेव्हा प्रशासनाने या सर्व अडचणींचा विचार करावा असे ही नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील इंग्रजी/मराठी माध्यमांच्या शाळांकडे मूलभूत सुविधा आहेत जेणेकरून विध्यार्थ्यांना पुरेसे अंतर राखून सर्व नियम पळून शिकवणे सहज शक्य आहे खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त नाही तेव्हा ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने विचार करावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!