Home लोहा पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप -NNL

पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप -NNL

लोहा| लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे नातू सुधाकर पाटील पवार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जिजामात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मराठवड्याचे आधुनिक भगीरथ श्रद्धेय डॉ शंकरराव चव्हाण यांच्या मुळे लोहा विठ्ठलवाडी वादावर पडदा पडला व लोहा नगर परिषद स्थापन झाली.माणिकराव पाटील पहिले नगराध्यक्ष तर कल्याणराव सुर्यवंशी हे पहिले उपनगराध्यक्ष होते.शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. सामाजिक समता प्रस्थापित केली शैक्षणिक संस्था उभ्या केल्या शिवाय चारशेहून अधिक जणांना नौकरी दिली. त्यांच्या जयंती निमित्त शिवछत्रपती विद्यालयात शालेय साहित्य वाटप करण्यात आले

काँग्रेसचे शहराध्यक्ष व जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत झालेली या कार्यक्रमासाठी नगरसेवक भास्कर पाटील पवार, नामदेव काका पवार,खविस चे व्हाईस चेअरमन श्याम पाटील पवार युवा कार्यकर्ते सचिन मुकदम, शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पवार, युवा कार्यकर्ते दीपक पाटील कानवटे, छावा चे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील सायाळकार, संयोजक सुधाकर पवार, नातू अविनाश पाटील, दशरथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार, नवनाथ पवार, गणेश पवार, आनंद पवार, बब्रुवान पवार, मुकुंद काळे यासह गावात मान्यवर तसेच शिक्षक वृंद उस्थितीत होते.

माणिकराव पाटील यांच्या प्रतिमेचे वसंतराव पवार व मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले.हरिहर धुतमल यांनी कै माणिकराव पाटील यांच्या कार्याची माहिती सांगितली तसेच त्यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान होते.ते सामाजिक समतावादी होते असे आवर्जून सांगितले. नगरसेवक भास्कर पाटील यानी विचार मांडले. संचलन व आभार आर आर पिठ्ठलवाड यांनी केले. सुधाकर पवार यांनी शहरातील तसेच काही खेड्यातील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. नगरपालिका सभागृहात कै माणिकराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!