Home करियर शाळा बंद होण्यापूर्वीच जवळ्यात ‘अभिरुप शाळा’ कार्यक्रम -NNL

शाळा बंद होण्यापूर्वीच जवळ्यात ‘अभिरुप शाळा’ कार्यक्रम -NNL

मुलींनीच सांभाळले एक दिवस शालेय प्रशासन ; स्वयंशासन दिनानिमित्त मूल्यसंवर्धन कार्यक्रम

नांदेड| शाळांमधून राबविण्यात येणाऱ्या शालेय तथा सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून अनेक जीवनमूल्ये रुजावीत व एक सर्वांगीण व्यक्तिमत्व घडावे ही अपेक्षा अभ्यासक्रमाद्वारे व्यक्त होते. यापैकीच एक विद्यार्थ्यांसाठी असलेला स्वयंशासन दिन होय.

यातून स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, चिकित्सक वृत्ती, वक्तशीरपणा, सुसंवाद, एकत्व आदींचे मूल्यसंवर्धन होते. परंतु १० जानेवारीपासून शाळा बंदची चाहूल लागताच जवळा दे. येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक ढवळे जी. एस.आणि सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा बंद होण्यापूर्वीच ‘अभिरुप शाळा’ हा उपक्रम यशस्वी केला.

स्वयंशासन दिन हा उपक्रम राबवितांना मुलींनीच पुढाकार घेऊन एक दिवस शालेय प्रशासन चालविले. यात मुख्याध्यापक म्हणून मुस्कान पठाण हिने तर शिक्षिका म्हणून साक्षी गोडबोले, शुभांगी गोडबोले, अक्षरा गोडबोले, पल्लवी कदम, दीक्षा झिंझाडे यांनी काम पाहिले. साक्षी गच्चे हिने सेविका म्हणून कर्तव्य पार पाडले. समारोप कार्यक्रमात संकल्प गोडबोले, शाहेद शेख, रितेश गवारे, कल्याणी शिखरे, किरण कदम, अक्षरा शिंदे, लक्ष्मण शिखरे, श्रुती मठपती, श्रावस्ती गच्चे, नंदनी टिमके, हैदर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैभवी शिखरे हिने तर आभार कृष्णा शिखरे याने मानले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!