Home आर्टिकल्स पतंग उडविणारानों जरा सांभाळून -NNL

पतंग उडविणारानों जरा सांभाळून -NNL

मकरसंक्रांती निमित्त लहान मुले,तरुण,नागरिक हे आपल्या फावल्या वेळेत शहरातील मोकळी मैदाने, निर्जनस्थळी,नदी,नाले,उंच टेकडी,उंच ईमारतीच्या स्लॕब वर जाऊन पतंग उडवितात. जानेवारी महिना लागला की तिळ व गुळापासून बनलेल्या मिठाईचे आणि आकाशात वर उंच उडणा-या पतंगाचे लहानापासून ते वयस्कार सर्वांनाच वेध लागलेले असते.

आपल्या भारतात प्रत्येक सण साजरा करण्याच्या पारंपरिक पध्दतीमध्ये एकता,एकोपा,बंधुभाव, सर्वधर्मसमभाव,बांधिलकी जपण्याचा उद्देश असतो. पतंग उडविण्यासाठी नायलाॕन व चिनी मांजाचा सर्रासपणे वापर करत आहेत.या मांजामुळे पक्ष्यासह, नागरिकांचे डोळे,नाक,कान,गळा व मानेला गंभीर ईजा होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पतंग उडविणारानों जरा सांभाळून बंदी असलेल्या नायलाॕन व चिनी मांजा हा शरीराला,अवयवाला घातक व दुखापत करणा-या मांजाचा वापर करु नका जेणेकरुन आपल्यामुळे दुस-याला ञास होणार नाही याची काळजी पतंग उडविणा-यानीं घेतली पाहिजे असे नम्र आवाहन अल ईम्रान प्रतिष्ठान चे अध्यक्ष मोहसीन खान यांनी केले.

प्रशासनाने चायनीज व नायलाॕन मांजाचा वापर,विक्री करण्यास बंदी घातली आहे.हा मांजा सहजासहजी तुटत नाही. हाताने जोर देऊन पण हा मांजा तुटत नाही उलट हाताला जखम होते.यामुळे पतंग उडविणा-या तरुणांई मध्ये सध्या नायलाॕन मांजा फारच लोकप्रिय आहे.एकमेकांची पतंग कापण्यासाठी अनेकवेळेस बंदी असलेल्या चिनी व नायलाॕन मांजामुळे विविध पक्ष्यांचे पंख,पायात मांजा अडकल्यामुळे पक्ष्यांचा जिव जात असल्याचे दिसते. तर दुसरीकडे नागरिकांच्या मानेला, गळ्यालासुध्दा अडकतो ज्यामुळे गंभीर दुखापतीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

बंदी असलेल्या नायलाॕन मांजा वापरामुळे विविध पक्षी,प्राणी व नागरिकांना आपले प्राणा गमवावे लागल्याने पेटा (पिपल फाॕर द ईथीकल ट्रिटमेंट आॕफ एनिमल) या संस्थेने हरीद लवादाकडे एनजीटी(याचिका) दाखल केले होते.त्यानंतर चिनी व नायलाॕन अशा धोकादायक,घातक मांजा वापर व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.तेंव्हापासून नायलाॕन मांजा विक्री कारणा-या विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाई केले जाते.पेटा हि संस्था पशु,पक्षी,प्राणी यांचे संरक्षण व देखभाल,काळजी यासाठी सन १९८० सालापासून संपुर्ण जगात काम करते.या संस्थेची स्थापना इंग्रिड न्युर्किक व एलेक्स पचोको या दोघांनी मिळून केली होती.आज मोठ्या प्रमाणात हि संस्था काम करित आहे.यासह भारतातील पण अनेक पक्षीमिञ,प्राणीमिञ व विविध संघटना,संस्था पण उत्कृष्ट काम करित आहेत.

 

मकरसंक्रांती निमित्त पतंग उत्सव साजरा करताना सर्वांनीच विजेच्या तारा,फिडर,विजेचे खांब,डिपीपासून दुर रहावे,काळजी घ्यावी,सुरक्षित रहावे तसेच बंदी असलेल्या नायलाॕन व चिनी मांजा,प्लाॕस्टिक पतंग चा वापर करु नये.कागदी पतंग व सहज तुटेल असा धागा वापरावा जेणेकरुन सर्व सुरक्षित राहतिल.

…..मोहसीन खान, अध्यक्ष अल ईम्रान प्रतिष्ठान,बिलोली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!