Home क्राईम नायगाव पोलिसांनी सापळा रचून 68 हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीस केलें जेरबंद -NNL

नायगाव पोलिसांनी सापळा रचून 68 हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीस केलें जेरबंद -NNL

नायगाव, दिगंबर मुदखेडे| नायगांव पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वा.नांदेड नरसी महामार्गावर १८ हजार रु किमतीचा गुटखा व ५० हजार रु किमतीची मोटार सायकल सह आरोपीस सापळा रचून पकडले. सदर घटनस राज्यमहामार्गारील डॉ वडजे हॉयस्पिटलच्या कॅनल जवळ घडली आहे. यामुळे महामार्गावरून रात्री अपरात्री गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत.

बुधवारी रात्री बालाजी पांचाळ रा.रुई हा गुटखा तस्करी करण्या साठी येणार असल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांना कळली. त्यानुसार त्यांनी वडजे हॉस्पिटल जवळ कॅनाल रोडलगत पोलीस कर्मचारी मसतापूरे,कुलकर्णी,इंगोले,सांगवीकर यांच्या मदतीने सापळा रचला. रात्री आकराच्या सुमारास पांचाळ हा मोटार सायकलवरून येताना दिसून आला.त्यास पकडून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केल्याची घटना दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजी घडलीआहे.

नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेला आरोपी बालाजी विश्वाभंर पांचाळ वय ३१ वर्ष राहणार रुई बु तालुका नायागांव यांनी दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ठीक अंदाजे १२ ते ०१ वाजेच्या सुमारास दोन बॅग गुटखा व मोटार सायकल पोलिसांनी पकडून जप्त केली व आरोपीस ताब्यात घेऊन गजाआड केले.

या संदर्भात पोहेका विलास मोतीराम मुस्तापुरे यांच्या फिर्यादी वरून नायागांव पोलिस ठाण्यात कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आरोपीस गुरुवारी नायगाव न्यायलयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. घटनेचा पुढील तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे हे करीत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!