Home क्राईम शेळ्या घरात घुसल्याच्या कारणावरुन इसमाचा खून -NNL

शेळ्या घरात घुसल्याच्या कारणावरुन इसमाचा खून -NNL

लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथील घटना

उस्माननगर, माणिक भिसे। शेळ्या आरोपीच्या घरात गेल्याच्या कारणावरून एका इसमाचा खून केल्याची घटना लोहा तालुक्यातील कलांबर .बु (भोपाळवाडी) येथे १३ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलिसांनी तिघाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोहा तालुक्यातील कलंबर बु. (भोपाळवाडी) येथील सलमान अब्दुल रहेमान पठाण यांच्या शेळ्या आरोपीच्या घरात गेल्याच्या कारणावरून गौसीया सरवर शेख, शब्बीर सरवर शेख व समीर सरवर शेख या तिघांनी ११ जानेवारी रोजी सायंकाळी सलमान अब्दुल यांच्यासह त्यांची आई, बहिण, भाऊ व वडीलास शिवीगाळ केली. यावेळी शब्बीर सरवर शेख याने अब्दुल रहेमान मौलासाब पठाण (५५) यांची कॉलर धरल्यानंतर समीर सरवर शेख याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पाठीमागुन डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. त्यामुळे नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाल्याने ते बेहोश पडले. अशा अवस्थेत अब्दुल रहेमान मौलासाब पठाण यांना पुढील उपचारासाठी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यानंतर यशोसाई हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

त्याची प्रकृती आणखी खालावल्याने पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले ,असता उपचारादरम्यान १३ जानेवारी रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सलमान अब्दुल रहेमान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिसांनी भा.द.वी.कलम ३०२,३०८,५०४,५०६,३४अनन्वे तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. डी. ए. देवकते हे करीत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!