Home करियर पालकांनी मुलींना शिकविले पाहिजे स.पो.नि.ज्ञानोबा देवकते -NNL

पालकांनी मुलींना शिकविले पाहिजे स.पो.नि.ज्ञानोबा देवकते -NNL

उस्माननगर, माणिक भिसे। राष्ट्रीय महापुरुषांचे आदर्श घेऊन पालकांनी आपल्या मुलीना चौकटीत न ठेवता त्यांना ज्ञानदानाचे शिक्षण देवून मुलींना शिकविले पाहिजे असे प्रतिपादन उस्माननगर पोलिस स्टेशन चे सपोनि ज्ञानोबा देवकते यांनी केले.


कलंबर ( खुर्द) ता.लोहा येथे ग्रामदैवत हनुमान मंदिर प्रांगणात जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. ए. देवकते यांनी उद्घाटन केले. यावेळी पंडित पवळे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, पत्रकार सुर्यकांत माली पाटील, देविदास डांगे, गणेश लोखंडे आदींची उपस्थिती होती. संयोजक सुरेश घोरबांड यांनी पाहुण्यांचे पुस्तक, रोपे, देवून स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्घाटक श्री. देवकते यांनी ” पालकांनी मुलींना शिकवावे. तरुणांनी महिलांचा आदर व सन्मान करावा. ” असे सांगितले. यावेळी पंडित पवळे म्हणाले ” मुलं मुलींना खूप शिकवा. व्यसनांपासून दूर रहा. आधुनिक काळात ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. काळा बरोबर चालले पाहिजे. यावेळी शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी चा सत्कार करण्यात आला. जिजाऊ चा वेषात लहान मुलींनी यावेळी जिजाऊ वंदना सादर केली.

 

कार्यक्रमात योगायोगाने संयोजक सुरेश पाटील घोरबांड यांचा वाढदिवस होता. तो विचारपीठावर साजरा करण्यात आला. यावेळी घोरबांड यांनी “गावासाठी भव्य एमपीएससी अकॅडमी आणि ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे . यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आभार नागठाणे यांनी मानले. र कार्यक्रमाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने करण्यात आली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!