Home अर्धापुर नगरपंचायत निवडणूक मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम – NNL

नगरपंचायत निवडणूक मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम – NNL

नांदेड| नगरपंचायत नायगाव, अर्धापूर व माहूर सार्वत्रिक निवडणूक 2021-22 च्या अनुषंगाने मंगळवार 18 जानेवारी 2022 रोजी मतदानाच्या दिवशी व बुधवार 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु करण्यात आले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नगरपंचायत नायगाव, अर्धापूर, माहूर सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी 18 जानेवारी रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील व 19 जानेवारी 2022 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामव्यतीथ्रकत खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

हा आदेश नगरपंचायत नायगाव, अर्धापूर व माहूर सार्वत्रिक निवडणूक 2021-22 च्या मतदानांच्या दिवशी मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत आणि मंगळवार 19 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.

नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशी मतदाराना सुट्टी अथवा दोन तासाची सवलत
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायत निवडणुकीचे मतदान मंगळवार 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासन अधिकारी शैलेश फडसे यांनी कळविले आहे.

मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायत मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या-त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!