Home लाइफस्टाइल जिल्ह्यातील प्रथम हदगाव तालुक्याची पाणी टंचाई बैठक संपन्न – NNL

जिल्ह्यातील प्रथम हदगाव तालुक्याची पाणी टंचाई बैठक संपन्न – NNL

हदगांव, शे.चांदपाशा| माहे जानेवारी ते मार्च या संभाव्य पाणी टंचाई तालुका स्तरीय आराखडा बैठक मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुमन मंगल कार्यालयात संपन्न झाली. सभापती सौ महादाबाई तम्मलवाड , माजी उपसभापती शेषेराव पाटील, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जीवराज डापकर, उपविभागीय पाणी पुरवठा अभियंता अशोक भोजराज, जिल्हा परिषद सदस्य मधुकरराव सरोदे, सावतकर, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी डॉ.निळे आदींची प्रमुख उपस्थित होती.

गटविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी प्रारंभी प्रास्ताविकात तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीचा टंचाई आढावा गावनिहाय घेण्यात आला.नांदेड जिल्ह्यात टंचाई आराखडा बैठक प्रथम घेण्यात हदगांव पंचायत समिती ने बाजी मारली आहे. याचा उल्लेख करुन गटविकास अधिकारी केशव गड्डापोड व टिमचे आमदार जवळगांवकर यांनी कौतुक केले.

पुढे ते म्हणाले की यंदा पाऊसमान चांगले असलेतरी काही गावे, वाडी तांड्यात संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणूनच पाणी टंचाईचे गांभीर्य विचारात घेऊन आपण आराखडा बैठक आयोजित केली आहे. आज तालुक्यातील सरपंच बांधवांना कोवीडचा वाढता प्रभाव विचारात घेता निमंत्रित केले नाही. परंतु त्यांच्या सहमतीने प्रारुप आराखडा संबंधित ग्रामसेवक यांनी आणला आहे. सरपंच यांच्या सर्व सुचनांची आजच्या बैठकीत नोंद घेतली आहे. सर्व ग्रामसेवक ग्राविअ यांनी टंचाई आराखडा मंजूरी नंतर ती कामे शीघ्र गतीने पुर्ण करावी म्हणजे टंचाई काळात ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल.

आराखडा बैठकीस तालुक्यातील ग्रामसेवक ग्राविअ, पाणी पुरवठा अभियंता सतीश हिरप, संजय संम्बोंड, अभियंता प्रकाश राठोड, सचिन नालंदे,शेख नजीर, विस्तार अधिकारी प्रदीप सोनटक्के, रणजित लोखंडे आदी उपस्थित होते. ईंजि.गणेशसिंह चंदेल यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या बैठकीत माञ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरपच यांना निमञित करण्यात आले नव्हते. माञ बहुतांशी गावात ग्रामसेवक व संबधित पाणी पुरवठ्याचे अभियंता यांचा समन्वय दिसुन आला नाही. विशेष म्हणजे जिथे नळ योजना रखडल्या बाबतीत ही फारशी चर्चा झाली नाही. नेहमी प्रमाणे पाणी पुरवठ्याचे आभियंता दरवर्षी होणा-या पाणी पुरवठा बैठकीत नेहमी प्रमाणे उत्तरे दिली. आमदार मोहदयांनी पण या बैठकीत कामचुकार कर्मचाऱ्यां बाबतीत ठोस अशी भुमिका दिसुन आलेली नाही.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!