Home अर्धापुर मालेगावच्या १० कोटी १६ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी -NNL

मालेगावच्या १० कोटी १६ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी -NNL

(पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नास यश)

अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील मालेगाव येथे जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा (नळ) योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यासाठी तब्बल १० कोटी १६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली असून, मालेगांव येथील जनतेचा अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न आता दूर झाला असून, ही योजना अंमलात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे एकूण ११ हजार लोकसंख्येसाठी केवळ एकाच कमी क्षमतेच्या पाणी पुरवठा योजने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होत असे. टंचाईच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. मालेगाव येथे कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मालेगाव येथील नागरिकांनी केली होती.

सदरील मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री चव्हाण यांनी तब्बल दहा कोटी 16 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजुरी केली असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेतून गावातील प्रत्येक घराला नळजोडणी मिळणार असून त्याचबरोबर शुद्ध पाणीही उपलब्ध होणार आहे. तब्बल चाळीस वर्षानंतर मालेगाव येथील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना सुरू होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मालेगावकरांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटला – अनिल इंगोले
पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तब्बल चाळीस वर्षानंतर मालेगाव येथे कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानेे अनेक वर्षाची मांगती पुर्ण होऊन पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला आहे. मालेगांव येथे पाणी पुरवठा योजना सुरू व्हावी यासाठी मालेगांव सातत्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून ही पाणी पुरवठा मंजूर केली अशी माहिती अनिल इंगोले, सरपंच मालेगाव यांनी दिली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!