Home किनवट शौर्यदिन व नामांतर दिनानिमित्त इस्लापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न -NNL

शौर्यदिन व नामांतर दिनानिमित्त इस्लापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न -NNL

इस्लापूर, गौतम कांबळे नंदगावकर| शौर्यदिन व नामांतर दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन किनवट आदिवासीबहुल भागातील इस्लापूर येथे समस्त संविधान प्रेमी यांच्या कडून करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन इस्लापुर नगरीच्या सरपंच सौ शारदा शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बोनगीर, नारायण दतलवाड, मनोज राठोड, चंद्रकांत पाकलवाड, दत्ता गड्डलवाड, डॉक्टर भगवान गंगासागर,बालाजी दुरपडे पाटील, नारायण शिनगारे, विठ्ठलराव गडपाळे,रवी कसबे, राजू आंबटवाड,स्टॅलीन आडे, जगदीश हनवते, रफीक पटेल, पोहेकर,व पत्रकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भव्य रक्तदान शिबीरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी बामणे तसेच पोलीस कर्मचारी, शिक्षक यांनी देखील सहभाग नोंदवून रक्तदान केले त्याच बरोबर शकडो तरूणासह तरूणीनी या भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान करण्यास मोठा उस्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी रक्तदान केलेल्या तरुणांना यावेळी इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी घोगरे पाटील, बालाजी बामणे, निर्गुण पाटील, शिवसेनेचे युवा नेते गजानन बच्चेवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस काशिनाथ शिंदे.अंकुश साबळे. रवी कसबे, परमेश्वर पेशवे, वंचित बहुजन आघाडीचे विलास भालेराव, यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

या रक्तदान शिबिरासाठी नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी व्हॉलेटरी ब्लड सेंटरचे डॉ,पी के कनकदंडे, टीआरओ, राहुल वाघमारे, टेक्नीशिअन रवी गवारे, आशिष कुरुडे, कोमल बेलकर, स्वाती आठवले, दिपाली बंडेवार, उध्दव मुळे, यांनी गुरुगोविंदसिंघजी व्हॉलेटरी ब्लड बँकेसाठी रक्त साठा जमा केला.
शौर्यदिन व नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात आलेले हे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तोफिक पटेल, गौरव कदम, मच्छीदर गजभारे, प्रशांत तीगोटे, अजय शेळके, अक्षय शेरे,किशोर भवरे, लक्ष्मीकांत वाघमारे, रोहित तीगोटे, सुजित मारेराव, अजय गजभारे, प्रवीण पवार, विक्रांत हनवते, संदेश शेळके,वैभव कांबळे, सुमेध कसबे, सुमेध्द गव्हाळे, किरण झनकारे, कपिल वानखेडे, यांनी परिश्रम घेतले,

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!