Home नांदेड प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी -NNL

प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी -NNL

नांदेड| शहरातील प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक क्रांतिकुमार पंडित यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भगवान येवले, बाबुराव गोडबोले, सुभाष लोखंडे, नितीन कोकरे, सिद्धार्थ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास शिल्पा लोखंडे, शोभाबाई गोडबोले, चौत्राबाई चींतूरे, सुमनबाई वाघमारे, आशाबाई हटकर, पद्मीनबाई गोडबोले यांची उपस्थिती लाभली. जयंतीनिमित्त बाल मित्रांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. आणि उपस्थित बालकांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजक सुभाष लोखंडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!