Home नायगांव अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भास्कर पाटील भिलवंडे यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट -NNL

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भास्कर पाटील भिलवंडे यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट -NNL

नायगाव, दिगंबर मुदखेडे| राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षानी बेसुमार निर्णय घेऊन तालुकाध्यक्ष भिलवंडे यांना पदावरून कार्यमुक्त केल्याचे धक्कादायक पत्र सूचना न देताच पक्षातून हाकलपटी केली असल्यामुळे तत्काळ नरसी येथे दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकाराच्या समोर झालेल्या अन्याय कारक निर्णयाची भूमिका स्पष्ट करून प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे भिलवंडे यांनी सांगितले.

राजकारण आणि राजकारणातील सूडबुद्धीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी करून नायगाव तालुकाध्यक्ष पदावरून हाकलपटी केले असल्याचा खळबळ जनक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्करराव भिलवंडे यांनी नरसी येथील निवास्थानी पत्रकार परिषदेत घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी परत चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात चर्चेला मोठे उधाण आले. पदावरून नुकतेच कार्यमुक्त करण्यात आलेले भास्करराव भिलवंडे यांनी मुबंई येथे प्रांतध्यक्ष ना.जयंत पाटील यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्षानी केलेल्या अन्याय कारक कार्यवाई या संदर्भात ग्रेट भेट घेऊन माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष की नुसती पक्षा अंतर्गत वादा वादी असा ही प्रश्न चर्चाला जाताना ऐकावयास मिळत आहे.

राज्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायागांव तालुकाध्यक्ष भास्करराव भिलवंडे यांच्यात झडलेली पक्षा अंतर्गतची गटबाजी अगदी चव्हाट्यावर आल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली असतानाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षानी बेसुमार निर्णय घेऊन तालुकाध्यक्ष भिलवंडे यांना पदावरून कार्यमुक्त केल्याचे धक्कादायक पत्र सूचना न देताच पक्षातून हाकलपटी केली. त्यामुळे त्यांनी तत्काळ नरसी येथे दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकाराच्या समोर झालेल्या अन्याय कारक निर्णयाची भूमिका स्पष्ट करून प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे भिलवंडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स.न २००९ ते २०२२ साला पर्यंत नायागांव तालुका अध्यक्ष पदावर पक्ष वाढीसाठी एकनिष्ठपणे काम केले असताना ही मला विश्वास न घेता तालुक्यात पाच पदाधिकाऱ्याचे निवड करण्यात आल्यानंतर सुद्धा मनात कसल्याच प्रकारची खंत न बाळगता मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा जबाबदार अध्यक्ष असल्यामुळे कुठल्या ही वर्तमान पत्रात तसेच सोशियल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधात अपप्रचार केला नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्याक्ष हरीहरराव भोसीकर यांनी माझ्या विरोधात गैरसमज पसरवून माझी नायागांव तालुका अध्यक्ष पदावरून हाकालपटी केल्याची प्रेसनोट काढून माझ्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरून तालुकाध्याक्ष पदावरून कार्यमुक्त केल्याचे ही त्यांनी सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांना बिलोली टाईम्स न्यूजच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष भास्करराव भिलंवडे यांच्यावर केलेल्या कार्यवाई संदर्भात संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी असे सांगितले की, तुम्ही येऊन मला भेटा फोनवर माहिती देणे होत नाही. म्हणून माहिती देण्यास टाळले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्करराव भिलवंडे यांच्या बदलची किती धग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्यात झडली यावर स्पष्ट दिसून येत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!