Home हिमायतनगर दासरी- माला दासरी समाज मंदिरासाठी निधी देणार – आ.जवळगावकर -NNL

दासरी- माला दासरी समाज मंदिरासाठी निधी देणार – आ.जवळगावकर -NNL

हिमायतनगर| शहरातील पळसपूर रोडवर दानपत्राद्वारे उपलब्ध झालेल्या जागेत दासरी- माला दासरी समाजाच्या समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी संपादक अनिल मादसवार यांना दिले. ते त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिल्यानंतर मादसवार यांनी समाजाच्या हिताचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली असता ते बोलत होते.

दासरी- माला दासरी शिक्षक धर्मपुरी नरसिंग मादसवार यांनी स्वर्गवाशी वडिलाच्या स्मर्णार्थ स्व.नरसिंग नरहरी मादसवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाज मंदिरासाठी ३० बाय ४० आकाराची जागा दानपत्राद्वारे दिली असून, या ठिकाणी समाजा कडुन राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासाठी हि जागा महत्त्वाची आहे. उपलब्ध झालेल्या जागेत समाजमंदिर उभारण्यासाठी समाजाचे जेष्ठ नेते मुरहरी यंगलवार, बालाजी सादूलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांनी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. लवकरच यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ.जवळगावकर यांनी दिले.

यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, दत्ता शिराने, शुद्धोधन हनवते, सोपान बोम्पीलवार, धम्मा मुनेश्वर, अनिल नाईक, सुभाष राठोड, डॉ.प्रकाश वानखेडे, गणेशराव शिंदे, सूर्यवंशी सर, संजय माने, शे रहीम पटेल, बाकी सेठ, गोविंद बंडेवार, संजय पेन्शनवार, संतोष शिंदे, साईनाथ पालदेवार, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!