Home राजकीय शिवसेना आमदार संतोष बांगर यांची नारायण राणे यांना धमकी -NNL

शिवसेना आमदार संतोष बांगर यांची नारायण राणे यांना धमकी -NNL

हिंगोली, दिनेश मुधोळकर। राणे हे भाजपचे पिसाळेले कुत्रे आहेत, अशी टीका याआधीच शिवसेनेच्या एका आमदाराने केली आहे. आता त्यात बांगर यांनी राणे यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने भाजप-सेनेतील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान एका पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून मी त्यांच्या कानशीलात लगावली असती, असे विधान केले होते.

शिवसेनेला वारंवार आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी थेट घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना बांगर यांनी राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची गंभीर धमकी दिल्यामुळे आता नवाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर राणे यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नाही तर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना थेट अटक करत संगमेश्वर आणि त्यानंतर महाड पोलिस ठाण्यात हलवले. केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांना अटक केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!