Home व्हिडीओ पोळा सणासाठी आवश्यक असलेल्या झुली शिवण्याचे काम प्रगतीपथावर -NNL

पोळा सणासाठी आवश्यक असलेल्या झुली शिवण्याचे काम प्रगतीपथावर -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर येथील टेलर दिनकरराव मुत्तलवाड यांनी झुली शिवण्याचे काम हाती घेतले असून, प्रगतीपथावर आहे. कितीही दुष्काळी परिस्थिती असली तरी बळीराजा वृषभ राज्याचा हा सण आनंदाने साजरा करत असल्याचे झुलीला मागणी वाढली आहे.

बळीराजाचा पोळा सण आगामी सप्टेंबर महिन्यातील दि.०६ सोमवारी साजरा होणार आहे. काही दिवसावर पोळा सण आल्यामुळे बाजारात बैलांच्या सजावटीचे साहित्य दाखल झाले असून, त्या निमित्ताने हिमायतनगर शहरात गेल्या पंचवीस वर्षापासून शिवनकाम करणारे टेलर दिनकरराव मुत्तलवाड यांनी वृषभराजाला सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या झुली शिवण्याचे काम सुरु केले आहे. दरवर्षीं ८ ते १० झुलीचे जोड शिवून विक्री करत असतात. तालुक्यात एकमेव टेलर असल्याने त्यांच्या झुलीला मागणी आहे. एक झुली शिवण्यासाठी एक दिवस लागतो, झुलीची जोड १ हजारांपासून ते ३ हजारांपर्यंत विक्री होत असते असे त्यांनी सांगितले.

यंदा दुष्काळी परिस्थिती असताना देखील शेतकरी राजा ऋषभ राजाचा पोळा सण उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत दिसत आहे. अतिवृष्टीने उडीद, मुग, ज्वारीसह सोयाबीन गेलं आता उरलेली, कापसाची पिके धोक्यात आली आहेत. असे असेल तरी परंपरेनुसार येणार पोळ्याचा सण साजरा करावंच लागणार आहे, कारण भारत हा कृषी प्रधान देश असून, आमच्या शेतकऱ्यांचा जीवन फक्त शेतीवर आणि आम्हाला साथ देणाऱ्या बैलांवर अवलंबून असते. कितीही ट्रैक्टर वाहने आली तरी शेतीला बैलाशिवाय महतव नाही त्यामुळे ऋषभ राजाचा हा पोळा सण दरवर्षी प्रमाणे यंदाही पोळा सण आनंदाने साजरा करणार असल्याचे शेतकरी रंगराव रामचंद्र राठोड दरेसरसम यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितलं आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!