Home निधन वार्ता पुराच्या पाण्यात कारसह वाहुन गेलेल्या राठोड पिता पुत्रावर शोकाकुळात अंत्यसंस्कार -NNL

पुराच्या पाण्यात कारसह वाहुन गेलेल्या राठोड पिता पुत्रावर शोकाकुळात अंत्यसंस्कार -NNL

मुखेड, रणजित जमखेडकर| तालुक्यातील कमळेवाडी येथुन कारने मुखेडकडे येत असताना मोती नाल्याला आलेल्या महापुरात कारसह पितापुत्र वाहून गेले होती. चालक कसाबसा कारमधुन बाहेर पडुन झाडांवर जाऊन बसुन बचावाला आहे. कारमधील पिता पुत्र बेपत्ता झाले होते. तब्बल २२ तासांनी पिता पुत्राचा शोध लागला सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेरळी शिवारात दोघांचे मृतदेह सापडले. आज दुपारी २ वाजता पिता पुत्राचा शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

कर्मवीर मा.आ.किशनरावजी राठोड यांचे चिरंजीव भगवानराव राठोड ६५ व त्यांच्या मुलगा संदिप भगवानराव राठोड ३८ व नोकर उध्दव देवकत्ते हे आपली चारचाकी कार क्र.एम.एच २० डि.जे.६९२० या कारने मुखेड शहरांकडे येत असतांना शहराजवळ असलेल्या मोती नाल्याला आलेल्या महापुरात पुराचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने कारसह तिघेही वाहून गेले होते.

यातील उध्दव देवकत्ते यांनी झाडांवर चढून आपला जिव वाचविला होता. त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं होतं दरम्यान पुराच्या पाण्यात वाहुन गेलेले भगवानराव राठोड व संदीप भगवानराव राठोड या पिता पुत्राचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. वाहुन गेलेली कार कालच नदीपात्रात सापडली होती. पण राठोड पिता पुत्राचा  शोध लागला नव्हता. पण सकाळी पाणी ओसरल्यानंतर बेरळी शिवारात दोघांचे मृतदेह आढळुन आले. दोन्ही पिता पुत्राचे मृतदेह मुखेड उपजिल्हा रुग्णालयात राठोड पिता पुत्राच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे.स्व.भगवान किशनराव राठोड हे मुखेडचे लोकप्रिय आ.डॉ. तुषार राठोड, मा.प्रा.नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांचे बंधू आहेत. संदिप राठोड हे पुतने आहेत. राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मधुन राठोड कुटुंबियांना सावरण्याची अनेकांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार, पालकमंत्री कार्येकर्ते,अधिकारी यांच्या सह आनेकांनी राठोड कुटुंबियाचे सांत्वन करीत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!