Home व्हिडीओ महाविद्यालयीन युवकाचा खुणामुळे हिमायतनगरात उडाली खळबळ-NNL

महाविद्यालयीन युवकाचा खुणामुळे हिमायतनगरात उडाली खळबळ-NNL

रुग्णालय परिसरात नागरिकांची तोबा गर्दी; गर्दीला पांगविताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

हिमायतनगर। शहरातील बसस्थानक भागात दिवसाढवळ्या एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात आला आहे. मयत युवकाचे नाव यश उत्तमराव मिरासे वय 17 वर्ष रा. कारला पी असे असून, सोहम चायल हा युवक गंभीर जखमी झाला आहे. तर खुन करनाऱ्या एका आरोपीचे नाव अनुज सुशांत पवनेकर (वय 18 वर्ष) असून, अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेेेह उचलणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळेेे पोलिस ठाणे परिसरात आणि रुग्णालय परिसरात तोबा गर्दी जमली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दि. ११ शनिवारी बसस्थानक परीसरात एक वाजता दोन ते तीन तरूणाने एका तरूणाचा खुन केल्याची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. यावेळी काहींनी पोलिसांना घटना घडताच फोन करून पाचारण केलं, परंतु पोलिस घटना घडल्यानंतर अर्धा तास उशीराने पोहचले अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. याच घटनेत सोहम चायल नामक तरूण युवक जख्मी झाला असून, मांडीला चाकू लागल्यानंतर पूर्ण पॅन्ट रक्तबंबाळ झाली आहे. त्याच्यावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या घटनेनंतर सांगितले जात आहे की, आरोपी व मयत हे मित्र होते काल यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्या वादाचे पर्यावसान आज भांडणात होऊन अनुज पवणेकर याने आपल्या दोन साथीदाराच्या संगनमताने खून केला, एवढेच नाहीतर सोडविण्यासाठी आलेल्या त्याच्या मित्रावरही आरोपीने चाकूने वार करून जखमी केले, आणि तो बोरि गावाच्या दिशेने फरार झाला.

दरम्यान खुनाच्या घटनेनंतर एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य दोन आरोपींच्या शोधात पोलिस असून, नागरिकांनी शांततेची भूमिका घेऊन पोलिसानं सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले आहे. हि घटना कश्यामुळे घडली याबाबत पोलिसांनी अद्याप तरी काहीही सांगण्यास नकार दिला आहे, एवढी मोठी दिवसाढवळ्या घडलेली घटना असतानाही एकही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिमायतनगर येथे भेट दिली नसल्यामुळे शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

दरम्यान आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी भेट दिल्यानंतर अनेक नागरिकांनी शहरांमध्ये पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे होत असलेली अवैध धंदे यासह विविध घटनांच्या तक्रारी केल्या आहेत. यावेळी जळगावकर म्हणाले शहरात व तालुक्यात घडणार्‍या घटना चुकीच्या आहेत. घडणाऱ्या घटनांची गंभीर दखल घेऊन या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान सीसीटीव्हीमध्ये घडत असलेली घटना कैद झाली असली तरी या बाजूला असलेल्या एकाही नागरिकांनी हा प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे बोलले जात आहे. यानंतर तरी हिमायतनगर पोलीस आपली कर्तव्यदक्षता दाखवून यापुढे अशा घटना होणार नाही याची काळजी घेतील का…? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जख्मींची विचारपूस केली व मयताच्या नातेवाइकांना धीर दिला, खासदार हेमंत पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रकरनात कुणाचीही गय करू नका असे आदेशित केले. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

एकुनच वारंगटाकळी येथिल कत्तीने वार करून झालेला खुनाचा प्रयत्न, सोनारी येथिल विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना, आज घडलेली खुनाची घटना पोलिसांचा वचक कमी झाल्याची जनतेतुन चर्चा होत असुन, नुसते सणा सुदिच्या काळात पथसंचलन न करता पोलिसांनी वचक वाढवुन दबदबा निर्माण करने गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेमुळे ग्रामिण भागातुन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या पालकांतुन चिंता व्यकत केली जात असुन भितीचे वातावरण आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!