Home हिमायतनगर हिमायतनगरातील कालच्या त्या घटनेतील तिघांना अटक आणि गुन्हा दाखल -NNL

हिमायतनगरातील कालच्या त्या घटनेतील तिघांना अटक आणि गुन्हा दाखल -NNL

पालक व नागरिकांच्या सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया, बसस्थानक भागात पोलीस चौकीची गरज

हिमायतनगर| शहरात काल भरदिवसा एका कॉलेजच्या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना घडली आहे. हि घटना जागरूक पालकांच्या मनाला सुन्न करणारी आहे. परमेश्वराची नगरी आणि गणेश उत्सवाच्या मंगलमय वातावरणात असताना घडलेली घटना निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकातून आणि सोशल मीडियावरून उमटत आहेत. आज त्यांना हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांंनी चार दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

काल दि.११ रोजी दुपारी १ च्या दरम्यान वर्दळीचे ठिकाण असलेल्या हिमायतनगर बसस्थानक परिसरात एका वर्गमित्राची दुसऱ्या मित्रांसोबत एक दिवस अगोदर ग्रुपची बदनामी केल्याच्या कारणावरून भांडण झाली होती असं सांगण्यात आले आहे. त्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी अनुज सुशांत पवनेकर (वय 18 वर्ष) याने दोन मित्र सलीम शे जब्बार आणि करणसिंग ठाकूर यांना सोबत घेऊन त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या सोहम चायल यास बसस्थानक परिसरात गाठले. या ठिकाणी अनुज सुशांत पवनेकर आणि सोहम चायल यांच्यात वाद झाला. यावेळी ग्रुपची बदनामी का करतो या कारणावरून अनुजने त्याच्याजवळील चाकूने सोहमच्या कमरेवर चाकूने वार केला. यात तो जखमी झाला त्यांचे भांडण सोडविण्यासाठी यश उत्तमराव मिरासे वय १७ वर्ष रा. कारला पी हा युवक गेला असता अनुजाने याच चाकूने यश उत्तमराव मिरासे यांच्या छातीत वार केला. या घटनेत तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला.

तात्काळ त्यास रुग्नालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेवरून हिमायतनगर शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित होऊन पंचनामा केला आणि सायंकाळी उशिरा मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर २१३/ २०२१ कलम ३०२, ३०७, ३४, भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अनुजाला पोलिसांनी पकडून आणले. मात्र सर्व आरोपीना जोपर्यंत आणले जात नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा अन्य दोघांना अटक केली आहे. सदर घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान कांबळे व त्यांचे सहकारी करत आहेत. आज तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयांनी चार दिवसाच्या पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून, पोलिस बंदोबस्त शहरात व बसस्थानक परिसरात नव्हता, त्यामुळे अश्या घटना घडत आहेत, ‌पोलीस अर्धा तास उशिरापर्यंत आली नाही वेळेवर पोलिस आली असती तर बालकाचा जिव वाचला असता अश्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या आहेत. शहरात गणेश उत्सवाच्या पर्व चालू असताना ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आले नाही. हिमायतनगर शहरातील सर्वात वर्दळीचे ठीकाण म्हणजे बसस्थानक आहे. या ठीकाणी कायम बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. खरे पाहता या ठिकाणी पोलीसांनी कायमची पोलीस चौकी उभारली पाहिजे अश्याही प्रतिक्रिया नागरीकातून समोर येत आहेत. एकंदरीत हि घटना पाहता शासनाने सदर घटने प्रकरणी सखोल चौकशीसाठी, चौकशी आयोग नेमावा. निवृत न्यायाधिशामार्फत चौकशी करावी असेही काही जनांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

दरम्यान सायंकाळी उपविभागीय अधिकारी भोकर गोपाळ रांजणकर यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. तसेच तासपच्या दिशेने योग्य त्या सूचना करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले, गुन्हा दाखल होऊन नातेवाईकांना एफआयआर देईपर्यंत उपविभागीय अधिकारी तळ ठोकून होते. गुन्हा दाखल करण्यात आल्यानन्तर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अटक केली आहे. आज सकाळी या तिने आरोपीला हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील तपासासाठी पोलिस कस्टडी मागली जाण्याची शक्यता आहे.

(नोट – एका शिक्षक पालकाने विचार करायला लावणारी लिहिलेली हि सोशल मीडियावरील पोस्ट)

पालक म्हणुन आपण कुठे कमी पडत आहोत का ?..
हिमायतनगर मधील ती चित्त थरारक घटना बघितली..म्हणजे दुर्दैवाने पहावी लागली.
अगदी ओठावर नुकतेच मिसरूड फुटलेले पोरं. पण केवढा तो आवेश?
किती कटुता? कुठला हा राग?
Cctv मधील तो वीडियो अनेकांनी आपल्या साईट वर मिरवला..
म्हणुन परत परत आठवण होत राहिली… मनाला असंख्य वेदना झाल्या. साने गुरुजी म्हणतात ती हीच का देवाघरची फुले?.
का विवेकानंद म्हणतात देश बदलवणे जमणारे हेच का ते वय ?
अगदी हात जोडून शाळेच्या मैदानात “अजाण आम्ही तुझी लेकुरे” म्हणणारे हेच हात कधी जानते झाले ते पालक म्हणुन आपल्यालाच कळले नसेल का? हा प्रसंग पूर्ण पालक वर्गाला विचार करायला लावणारा आहे मात्र नक्की.
आपली मुलं थोडी मोठी झाली की मग आपण हळू हळू त्यांच्याकडे लक्ष कमी देतो. काल ज्यांना शाळेत सोडायला जावे लागायचे आज तेच बाइक चालवण्यात आपल्यापेक्षा तरबेज झालेले पाहून कौतुक वाटते नाही का? वाटायला हवं.. पण, त्याच्या/ तिच्या सोबत जाऊन कधी शाळेत/ शिकवणी वर्गात डोकावण्याचे आता मात्र राहूनच जाते.. का दुर्लक्षच करत आहोत आपण?
त्याला/ तिला कोण मित्र मैत्रिणी आहेत? ते कसे आहेत, कुठे राहतात, याचे व त्यांचे कधी बिनसले का?
हे सगळे विचारायला आपल्याला त्याच्या सोबत कधीतरी दिलखुलास गप्पा मारायला हव्यात नाही का?
मलातरी असे वाटते मुले स्वतः जातात शिकवणी वर्ग निवडतात, शाळा निवडू पाहतात व आपणही गमतीने हसत हसत म्हणतो..” आता सर्व तोच पाहतो काही सांगाव लागत नाही “

कदाचीत इथेच तर चुकत नसेल आपण?.. आपण नको तेव्हढे स्वातंत्र्य देवून त्याचेच नुकसान करत आहोत.. त्याला कुठे शिकायला पाठवायचे हे आपणच ठरवले तर काय नुकसान होणार आहे?
प्रत्येक मागितलेली वस्तू नाही दिली तर थोडा त्रास करून घेईल, पण नकार पचवायला सुद्धा शिकेल तो.
गरिबीच्या झळा ( गरीबी नसली तरीही) थोड्या पोहोचू दिल्या तर थोडा शिकून शहाणा होईल कदाचित !
बाइक लगेच कशाला?, सायकल शिकवेलं की त्याला आयुष्यात चढ-उतार कसे असतात ते!..
अधुन मधुन द्या की पाठीवर कौतुकाची थाप व एखादा धपाटा बापाच्या हक्काने.. समजेल त्याला अजुनही लहान आहे तो…
त्याच्या मित्रांना बोलवा आणि मारा गप्पा कधीतरी, करतील ते पण रीते त्यांचे भरलेले मन. मग खेळा सोबत घेऊन त्यांना क्रिकेट, कॅरम किंवा अंताक्षरी.. जुळतील मग सूर आपले व त्यांचे!..

घ्या शाळेतील गुरुजींची भेट व द्यायला सांगा कानशिलात त्याच्या जर कधी चुकला किंवा बोलला उद्धट तर..
स्मार्ट फोन तर दिला आपण त्याला पण व्हावे लागेल स्मार्ट पालक पण..
पैशाची काटकसर ही तर जीवनात महत्वाची पायरी, मग त्यालाही शिकवावी लागेल मुद्दाम काटकसर करून खर्च करायला…
रंगीबेरंगी केस केले तर रागवा त्याला ही फॅशन बिशन काही नको. ही आपली संस्कृती नाही म्हणुन बजावायला काय हरकत आहे?
आयांनो तुम्ही सुद्धा विचारा त्याला आज शालेत काय घडले / बिघडले ते! किंवा घ्या की लहानपणी घ्यायचा तसा होमवर्क करवून..
कितीही मोठा झाला तरी सांगा कधीतरी कहाणी ( bed story )..
मदत घ्या की त्याची घरकामात बोलेल मग जास्त तुमच्याशी सुद्धा…सहज भावना जागृत झाल्या म्हणुन हा लिहण्याचा प्रपंच…!
कितीही झाल तरी अगदी उमलत्या वयात पोरं भरकटली … यातना तर सर्व समाज भोगतो आहेच ! पहा पटल तर घ्या!
……आडेलु नामदेव भाटे,  9730281744

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!