Home विदर्भ महांडूळ तस्करी प्रकरणात दोघांना कोठडी -NNL

महांडूळ तस्करी प्रकरणात दोघांना कोठडी -NNL

हिंगोली, दिनेश मुधोळ। औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा येथे शुक्रवारी दहशतवद विरोधी पथकाने छापा मारून तीस लाखाचे महांडूळ व दोन आरोपींना ताब्यात घेऊन वनविभागाकडे हा गुन्हा वर्ग केला होता. त्यानंतर आरोपी गौतम भिकाजी सपाटे व अविनाश गौतम सपाटे यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला .

शनिवारी औंढा नागनाथ प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्याय दंडाधिकारी यांनी सदरील दोन्ही आरोपींना तीन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. यातील आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य इलेक्ट्रिक वजन काटा , दोन टेलर टेप जमा करण्यात आले.

 

विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्रधिकारी कुंडलिक होरे वन परिमंडळ अधिकारी संदीप वाघ, टी. एम. सय्यद, वनरक्षक अमोल झिंनकरवाड, एन. एस. तायडे, आर.जी. श्रीरामे, बी.एफ.जाधव, आनंत राठोड, अंगत आईदे, सुदर्शन पोले कर्मचारी उपस्थित होते. सदर गुन्ह्यातील तपास विभागीय वनाधिकारी कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे करत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!