Home निधन वार्ता मिराशे कुटुंबिंयांचे माजी आ. आष्टीकर, कोहळीकरांनी केले सांत्वन -NNL

मिराशे कुटुंबिंयांचे माजी आ. आष्टीकर, कोहळीकरांनी केले सांत्वन -NNL

हिमायतनगर। शहरातील बसस्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत निष्पाप विद्यार्थ्यी यश मिराशे याचा खुन झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिराशे कुटुंबिंयांची माजी आ. नागेश पाटील आष्टीकर व बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट देऊन सांत्वन केले.

कारला येथील यश मिराशे खुनातील घटनेची सखोल चौकशी करून घटनेचा तपास करावा अशी मागणी कुटुंबिंयांनी केली आहे. रविवारी बाबुराव कदम कोहळीकर यांनी मिराशे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तर सोमवारी माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट दिली. यावेळी आष्टीकर यांनी पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लक्ष देऊन योग्य ती चौकशी व्हावी अशा सुचना केल्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, बाळु चवरे, शंकर पाटील, विठ्ठल ठाकरे, अरविंद पाटील, राम मोरे, उपस्थित होते. तर कोहळीकर यांच्या सोबत विजय वळशे, राम सुर्यवंशी, गजानन हरडपकर यांच्यासह अनेक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!