Home नांदेड नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे -NNL

नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 801 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 309 एवढी झाली असून यातील 87 हजार 645 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

आजच्या घडीला 13 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे.

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 2, खाजगी रुग्णालय 1, बिलोली तालुक्यातर्गंत 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 13 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, व्यक्ती उपचार घेत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!